साखर कारखान्याचे खेटे मारणे बंद; शेतकऱ्यांना गाव शिवारात बसून करता येणार उसाची नोंदणी

हॅलो कृषी ऑनलाईन : राज्यातील ऊस उत्पादक शेतकऱ्यांना ऊस नोंदणीसाठी साखर कारखान्यांकडे खेट्या मारण्याचे प्रकार आता बंद होणार आहेत. शेतकऱ्यांना गावशिवारात बसून ऊस नोंदविण्यासाठी शासनाने ‘महाऊस नोंदणी’ मोबाईल ऍप चालू केले आहे. सहकारमंत्री अतुल सावे यांच्या उपस्थितीत सोमवारी (२९) साखर आयुक्तालयात शेतकऱ्यांच्या उपस्थितीत या अॅप्लिकेशनचा प्रारंभ झाला. यावेळी बोलताना साखर आयुक्त म्हणाले की, ‘‘महाऊस नोंदणी … Read more