Category: Urad

  • सद्य हवामान स्थितीत कसे कराल पीक व्यवस्थापन ? वाचा तज्ञांचा सल्ला

    हॅलो कृषी ऑनलाईन : प्रादेशिक हवामान केंद्र,मुंबई येथून प्राप्त झालेल्या अंदाजानुसार मराठवाडयात पुढील पाच दिवस तूरळक ठिकाणी मध्यम स्वरूपाच्या पावसाची शक्यता आहे. सद्य हवामान स्थिती नुसार वसंतराव नाईक मराठवाडा कृषि विद्यापीठ, परभणी येथील ग्रामीण कृषि मौसम सेवा योजनेतील तज्ञ समितीने पुढील प्रमाणे कृषि हवामान आधारीत कृषि सल्ल्याची शिफारश केली आहे.

    पीक व्‍यवस्‍थापन

    कापूस : कापूस पिकात रसशोषण करणाऱ्या किडींच्या (मावा, फुलकिडे) व्यवस्थापनासाठी 5% निंबोळी अर्काची किंवा लिकॅनीसिलीयम लिकॅनी (जैविक बुरशीजन्य किटकनाशक) एक किलो ग्रॅम किंवा फलोनिकॅमिड 50% 60 ग्रॅम किंवा डायनेटोफ्यूरॉन 20% 60 ग्रॅम किंवा बुप्रोफेंझीन 25% 400 मिली किंवा डायफेन्थुरॉन 50% 240 ग्रॅम प्रति एकर पावसाची उघाड बघून फवारणी करावी. कापूस पिकावरील गुलाबी बोंडअळीच्या व्यवस्थापनासाठी हेक्टरी 5 गुलाबी बोंडअळीसाठीचे कामगंध सापळे लावावेत. कापूस पिकातील डोमकळ्या वेचून नष्ट कराव्यात. प्रादूर्भाव जास्त आढळून आल्या प्रोफेनोफॉस 50% 400 मिली किंवा इमामेक्टीन बेन्झोएट 5% 88 ग्रॅम किंवा प्रोफेनोफॉस 40% + सायपरमेथ्रीन 4% 400 मिली किंवा थायोडीकार्ब 75% 400 ग्रॅम प्रति एकर आलटून पालटून पावसाची उघाड बघून फवारावे.

    तूर : तूर पिकावरील पाने गुंडाळणारी अळीच्या व्यवस्थापनासाठी 5% निंबोळी अर्काची किंवा क्विनॉलफॉस 25% 16 मिली प्रति 10 लिटर पाण्यात मिसळून पावसाची उघाड बघून फवारणी करावी.

    मुग/उडीद : काढणी केलेल्या शेंगा मळणी केलेल्या मुग/उडीद पिकाची सुरक्षित ठिकाणी साठवणूक करावी. शेंगा पावसात भिजणार नाहीत याची काळजी घ्यावी.

    भुईमूग : उशीरा पेरणी केलेल्या भूईमूग पिकात मावा, फुलकिडे याच्या व्यवस्थापनासाठी इमिडाक्लोप्रिड 17.8 एस एल 2 मिली किंवा क्विनॉलफॉस 25 ईसी 20 मिली किंवा ऑक्झीडीमेटॉन मिथाईल 25 ईसी 20 मिली किंवा लॅमडा सायहॅलोथ्रीन 5 ईसी 6 मिली प्रति 10 लिटर पाण्यात मिसळून पावसाची उघाड बघून फवारणी करावी. जेथे शक्य आहे तेथे रब्बी भुईमूग पिकाच्या पेरणीसाठी पूर्व मशागतीची कामे करून घ्यावी. रब्बी भुईमूग पिकाची पेरणी 30 सप्टेंबर पर्यंत करावी.

    मका : काढणीस तयार असलेल्या मधु मका पिकाची काढणी करून घ्यावी.

    ज्वारी : जेथे शक्य आहे तेथे रब्बी ज्वारी पिकाच्या पेरणीसाठी पूर्व मशागतीची कामे करून घ्यावी. रब्बी ज्वारी पिकाची पेरणी ऑक्टोबर महिन्याच्या पहिल्या पंधरवाडयात (1 ते 15 ऑक्टोबर) करावी.

    रब्बी सूर्यफूल : जेथे शक्य आहे तेथे रब्बी सुर्यफुल पिकाच्या पेरणीसाठी पूर्व मशागतीची कामे करून घ्यावी. रब्बी सुर्यफलाची पेरणी ऑक्टोबर महिन्याच्या पहिल्या पंधरवाडयात करावी.

     

  • उडिदाला मिळतोय चांगला भाव; पहा आजचे राज्यातील उडीद बाजारभाव




    उडिदाला मिळतोय चांगला भाव; पहा आजचे राज्यातील उडीद बाजारभाव | Hello Krushi











































    हॅलो कृषी ऑनलाईन : शेतकरी मित्रांनो, सध्या राज्यातील बाजार समित्यांमध्ये उडिदाची आवक कमी होत असली तरी उदिडला चांगला भाव मिळतो आहे. आज सायंकाळी पाच वाजेपर्यंत प्राप्त राज्यातील विविध कृषी उत्पन्न बाजार समित्यांमधील उडीद बाजारभावानुसार आज उडीदाला सर्वाधिक कमाल ९००० रुपयांचा भाव मिळाला आहे.

    हा भाव पुणे कृषी उत्पन्न बाजार समितीत मिळाला असून आज या बाजार समितीत तीन क्विंटल उडीदाची आवक झाली. याकरिता किमान भाव 8100, कमाल भाव 9000 आणि सर्वसाधारण 8850 रुपये इतका मिळाला.

    तर आज सर्वाधिक आवक ही जामखेड कृषी उत्पन्न बाजार समिती येथे झाली असून या बाजार समितीमध्ये आज112 क्विंटल उडीदाची आवक झाली. याकरिता किमान भाव 6500 कमाल भाव 7350 आणि सर्वसाधारण भाव 6925 रुपये मिळाला आहे.

    आजचे उडीद बाजारभाव

    बाजार समिती जात/प्रत परिमाण आवक कमीत कमी दर जास्तीत जास्त दर सर्वसाधारण दर
    14/09/2022
    पुणे क्विंटल 3 8100 9000 8550
    बीड हायब्रीड क्विंटल 29 4002 7490 6168
    जालना काळा क्विंटल 3 6775 6850 6800
    अकोला काळा क्विंटल 6 4200 6500 6305
    जळगाव काळा क्विंटल 105 4000 7300 7200
    अक्कलकोट काळा क्विंटल 575 6000 7600 7200
    उदगीर काळा क्विंटल 15 7600 7900 7750
    हिंगोली काळा क्विंटल 2 5100 5445 5272
    शेवगाव काळा क्विंटल 23 6800 7100 6800
    गेवराई काळा क्विंटल 3 5700 6000 5700
    देउळगाव राजा काळा क्विंटल 2 6026 6700 6700
    केज काळा क्विंटल 3 6300 6801 6501
    तुळजापूर काळा क्विंटल 95 6500 7400 7000
    दुधणी काळा क्विंटल 356 7010 7675 7345
    मुंबई लोकल क्विंटल 21 6000 6500 6200
    मुरुम लोकल क्विंटल 118 5000 7401 6201
    परांडा लोकल क्विंटल 9 6000 7200 7000
    सोलापूर मोगलाई क्विंटल 172 6380 7545 7375

     

    error: Content is protected !!





  • उडीद बाजार वधारला ! आज मिळाला कमाल 10,500 रुपयांचा भाव

    हॅलो कृषी ऑनलाईन : शेतकरी मित्रांनो तुरीच्या बाजारात दरवाढ झाल्यानंतर उडीदाच्या बाजारात सुद्धा दर वाढ झाल्याचे दिसून आलं होतं उडीदला कमाल 9000 रुपयांचा भाव मिळत होता मात्र आजचे बाजार भाव पाहिले असता. उडीदला रेकॉर्ड ब्रेक असा दर मिळालेला आहे. आज उडीदला कमाल भाव 10500 मिळालेला आहे.

    आज सायंकाळी ४ वाजेपर्यंत प्राप्त झालेल्या राज्यातील कृषी उत्पन्न बाजार समितीनमधील उडीद बाजरभावानुसार आज कल्याण कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये तीन क्विंटल उडीदाची आवक झाली याकरिता किमान भाव 9500 कमाल भाव दहा हजार पाचशे तर सर्वसाधारण भाव हा दहा हजार रुपये इतका मिळाला आहे. सध्या बाजारात उडदाची आवक कमी असली तरी दर मात्र चांगले मिळत आहेत

    त्यामुळे तुरीचा दर जरी कमी झाला असला तरी उडीद बाजारात मात्र तेजी कायम असल्याचे दिसून येत आहे. शिवाय इतर कृषी उत्पन्न बाजार समितीमधील बाजार भाव आणि आवक पाहता आवक ही वाढलेली दिसून येत आहेत. आज सर्वाधिक उडीदाची आवक ही दुधनी कृषी उत्पन्न बाजार समिती येथे झाली असून ही अवक 254 क्विंटल इतकी झाली आहे. याकरिता किमान भाव 7350, कमाल भाव सात हजार पाचशे पाच आणि सर्वसाधारण भाव 7430 रुपये इतका मिळाला आहे.

    (महत्वाची टीप : ‘हॅलो कृषी’ द्वारा दिलेले शेतमाल बाजारभाव हे महाराष्ट्र राज्य कृषी पणन मंडळाच्या अधिकृत वेबसाईच्या माध्यमातून रोज अपडेट झालेले बाजारभाव असतात. याबाबत ‘हॅलो कृषी’ कोणताही दावा करीत नाही. दर सतत कमी जास्त होत असतात. त्यामुळे शेतकऱ्यांनी दराबाबत पुन्हा एकदा खात्री करून मगच बाजरात विक्रीसाठी माल न्यावा. )

    आजचे उडीद बाजारभाव

    29/08/2022
    पुणे क्विंटल 2 8400 9000 8700
    कारंजा क्विंटल 35 3540 4805 4500
    मंगळवेढा क्विंटल 3 6400 6400 6400
    बीड हायब्रीड क्विंटल 1 3435 3435 3435
    कल्याण हायब्रीड क्विंटल 3 9500 10500 10000
    वाशीम काळा क्विंटल 25 4500 7200 6000
    शेवगाव काळा क्विंटल 3 6101 6101 6101
    औराद शहाजानी काळा क्विंटल 2 7150 7150 7150
    तुळजापूर काळा क्विंटल 60 6100 7100 6800
    देवळा काळा क्विंटल 1 6805 6805 6805
    दुधणी काळा क्विंटल 254 7350 7505 7430
    अमरावती लोकल क्विंटल 3 3500 5300 4400
    मुंबई लोकल क्विंटल 77 6000 6500 6200
    जामखेड लोकल क्विंटल 11 4000 7200 5600
    मुरुम लोकल क्विंटल 12 5000 6666 5833
    उमरगा लोकल क्विंटल 1 4500 6000 5500

  • उडीदाचे भाव अद्यापही कमाल 9 हजार रुपयांवर टिकून; पहा आजचे उडीद बाजारभाव

    हॅलो कृषी ऑनलाईन : शेतकरी मित्रांनो तुरीनंतर बाजारात बाजारात उडिदाचा भाव वाढला. तुरीच्या भावात सध्या घट झाली असली तरी उडीदाचे भाव मात्र टिकून आहेत. मागच्या काही दिवसांपासून अद्यापही उदिडला कमाल ९ हजार रुपयांचा भाव मिळतो आहे.

    आज सायंकाळी ५ वाजेपर्यंत प्राप्त राज्यातील उडीद बाजारभावानुसार आज पुणे कृषी उत्पन्न बाजार समितीत सर्वाधिक ९ हजारांचा कमाल भाव मिळाला. आज पुणे बाजार समितीत २ क्विंटल उडिदाची आवक झाली याकरिता किमान भाव 8400, कमाल भाव 9000, आणि सर्वसाधारण भाव 8700 रुपये मिळाला.

    (महत्वाची टीप : ‘हॅलो कृषी’ द्वारा दिलेले शेतमाल बाजारभाव हे महाराष्ट्र राज्य कृषी पणन मंडळाच्या अधिकृत वेबसाईच्या माध्यमातून रोज अपडेट झालेले बाजारभाव असतात. याबाबत ‘हॅलो कृषी’ कोणताही दावा करीत नाही. दर सतत कमी जास्त होत असतात. त्यामुळे शेतकऱ्यांनी दराबाबत पुन्हा एकदा खात्री करून मगच बाजरात विक्रीसाठी माल न्यावा. )

    आजचे उडीद बाजारभाव

    बाजार समिती जात/प्रत परिमाण आवक कमीत कमी दर जास्तीत जास्त दर सर्वसाधारण दर
    26/08/2022
    पुणे क्विंटल 2 8400 9000 8700
    दुधणी काळा क्विंटल 101 7205 7505 7355
    मुंबई लोकल क्विंटल 35 6000 6500 6200
    मुरुम लोकल क्विंटल 22 4480 6666 5573
    25/08/2022
    पुणे क्विंटल 3 8600 9000 8800
    बीड हायब्रीड क्विंटल 1 4825 4825 4825
    कल्याण हायब्रीड क्विंटल 3 8000 9000 8500
    अकोला काळा क्विंटल 2 5100 5100 5100
    मालेगाव काळा क्विंटल 1 5300 5300 5300
    पैठण काळा क्विंटल 1 2200 2200 2200
    गेवराई काळा क्विंटल 1 3000 3000 3000
    दौंड काळा क्विंटल 1 6000 6000 6000
    कुर्डवाडी-मोडनिंब काळा क्विंटल 6 4800 6701 6400
    कळंब (उस्मानाबाद) काळा क्विंटल 1 4950 4950 4950
    दुधणी काळा क्विंटल 82 6755 7400 7080
    अमरावती लोकल क्विंटल 3 3500 5350 4425
    मुंबई लोकल क्विंटल 115 6000 6500 6200
    सोलापूर मोगलाई क्विंटल 131 6330 7365 7110