Category: Urad Rate Maharashtra

  • उडिदाला मिळतोय चांगला भाव; पहा आजचे राज्यातील उडीद बाजारभाव




    उडिदाला मिळतोय चांगला भाव; पहा आजचे राज्यातील उडीद बाजारभाव | Hello Krushi











































    हॅलो कृषी ऑनलाईन : शेतकरी मित्रांनो, सध्या राज्यातील बाजार समित्यांमध्ये उडिदाची आवक कमी होत असली तरी उदिडला चांगला भाव मिळतो आहे. आज सायंकाळी पाच वाजेपर्यंत प्राप्त राज्यातील विविध कृषी उत्पन्न बाजार समित्यांमधील उडीद बाजारभावानुसार आज उडीदाला सर्वाधिक कमाल ९००० रुपयांचा भाव मिळाला आहे.

    हा भाव पुणे कृषी उत्पन्न बाजार समितीत मिळाला असून आज या बाजार समितीत तीन क्विंटल उडीदाची आवक झाली. याकरिता किमान भाव 8100, कमाल भाव 9000 आणि सर्वसाधारण 8850 रुपये इतका मिळाला.

    तर आज सर्वाधिक आवक ही जामखेड कृषी उत्पन्न बाजार समिती येथे झाली असून या बाजार समितीमध्ये आज112 क्विंटल उडीदाची आवक झाली. याकरिता किमान भाव 6500 कमाल भाव 7350 आणि सर्वसाधारण भाव 6925 रुपये मिळाला आहे.

    आजचे उडीद बाजारभाव

    बाजार समिती जात/प्रत परिमाण आवक कमीत कमी दर जास्तीत जास्त दर सर्वसाधारण दर
    14/09/2022
    पुणे क्विंटल 3 8100 9000 8550
    बीड हायब्रीड क्विंटल 29 4002 7490 6168
    जालना काळा क्विंटल 3 6775 6850 6800
    अकोला काळा क्विंटल 6 4200 6500 6305
    जळगाव काळा क्विंटल 105 4000 7300 7200
    अक्कलकोट काळा क्विंटल 575 6000 7600 7200
    उदगीर काळा क्विंटल 15 7600 7900 7750
    हिंगोली काळा क्विंटल 2 5100 5445 5272
    शेवगाव काळा क्विंटल 23 6800 7100 6800
    गेवराई काळा क्विंटल 3 5700 6000 5700
    देउळगाव राजा काळा क्विंटल 2 6026 6700 6700
    केज काळा क्विंटल 3 6300 6801 6501
    तुळजापूर काळा क्विंटल 95 6500 7400 7000
    दुधणी काळा क्विंटल 356 7010 7675 7345
    मुंबई लोकल क्विंटल 21 6000 6500 6200
    मुरुम लोकल क्विंटल 118 5000 7401 6201
    परांडा लोकल क्विंटल 9 6000 7200 7000
    सोलापूर मोगलाई क्विंटल 172 6380 7545 7375

     

    error: Content is protected !!





  • उडीदाचे भाव तेजीत; सरकार करणार आयात उडिदाची खरेदी; फायदा कुणाचा ?

    हॅलो कृषी ऑनलाईन : सध्या देशात उडिदाला चांगला भाव मिळतो आहे. त्यामुळे उडीद डाळीचे दर देखील तेजीत आहेत. पुढील काळात देखील उडिदाचे भाव चढेच राहण्याची शक्यता आहे. त्यामुळे केंद्र सरकार नाफेडमार्फत आयात उडिदाची खरेदी करणार आहे.

    पुढील दोन महिने सणांचे आहेत. उडदाच्या दरात आणखी वाढ होण्याची शक्यता आहे. त्यामुळं सरकारला दर नियंत्रणासाठी उडीद पुरवठा करणं गरजेचं आहे. मात्र सरकारकडे उडदाचा केवळ ३५ हजार टन बफर स्टाॅक आहे. त्यातच सध्या देशात उडदाची आवक बाजारात वाढलेली नाही. त्यामुळं केंद्र सरकारने नाफेडला व्यापाऱ्यांकडून आयात उडदाची खरेदी करण्यास सांगितले आहे. त्यासाठी निविदाही मागवल्या आहेत. मात्र त्यासाठी आंतरराष्ट्रीय निविदा न काढता आयातदारांकडून निविदा मागवल्या आहेत. नाफेड २५ हजार ते ३५ हजार टन आयात उडीद खरेदी करण्याची शक्यता आहे. रोज २ हजार टन उडदाची खरेदी होईल. नाफेड आयात मालाची पहिल्यांदाच खरेदी करत नाही. यापुर्वी तीन वेळा नाफेडने अशी खरेदी केली आहे.

    आयात उडीद महाग

    सध्या आयात उडदाचे दर ७ हजार ते ७ हजार ५०० रुपये प्रतिक्विंटल आहेत. जो व्यापारी कमी किमतीत उडीद देईल, त्याच्याकडून नाफेड खरेदी करणार आहे. पण कोणता व्यापारी चालू बाजारभावापेक्षा कमी दरात नाफेडला उडीद देईल? म्हणजेच आयात उडीद जास्त दरानेच खरेदी करावा लागेल. त्यासाठी सरकारला जास्त पैसा मोजावा लागेल.

    सरकारने शेतकऱ्यांचा माल बाजारात आला तेव्हा खरेदी केली असती तर ही वेळ आली नसती. उडीद आवकेच्या ऐन हंगामात नाफेड खरेदीत नसल्यानं खुल्या बाजारात शेतकऱ्यांना प्रतिक्विंटल ६ हजार रुपयांपेक्षाही कमी दर मिळाला. नाफेडने या काळात खेरदी केली असती तर शेतकऱ्यांनाही किमान हमीभाव मिळाला असता, आणि सरकारलाही ६ हजार ३०० रुपये क्विंटलने उडीद खरेदी करता आला असता.

    विदेशातील शेतकरी, व्यापाऱ्यांना फायदा

    देशातील उत्पादन कमी झाल्यानंतरही सरकारने हमीभाव खरेदीचा आधार दिला नाही. त्यामुळं यंदा शेतकरी पर्यायी पिकांकडे वळाले आहेत. परिणामी चालू हंगामात लागवड कमी झाली. सरकारवर आयात उडीद खरेदी करण्याची वेळ आली. त्याऐवजी सरकारने खरेदीत उतरून बाजाराला आधार दिला असता तर उत्पादन कमी राहिल्यानं खुल्या बाजारातही दर सुधारले असते. पण असं झालं नाही. सरकारनं देशातील शेतकऱ्यांचं भलं करण्याऐवजी म्यानमारमधील व्यापारी आणि शेतकऱ्यांचचं भलं करण्याचं ठरवलंय की काय? असा प्रश्न उपस्थित होतोय.

    संदर्भ : ऍग्रोवन

  • उडीद बाजार वधारला ! आज मिळाला कमाल 10,500 रुपयांचा भाव

    हॅलो कृषी ऑनलाईन : शेतकरी मित्रांनो तुरीच्या बाजारात दरवाढ झाल्यानंतर उडीदाच्या बाजारात सुद्धा दर वाढ झाल्याचे दिसून आलं होतं उडीदला कमाल 9000 रुपयांचा भाव मिळत होता मात्र आजचे बाजार भाव पाहिले असता. उडीदला रेकॉर्ड ब्रेक असा दर मिळालेला आहे. आज उडीदला कमाल भाव 10500 मिळालेला आहे.

    आज सायंकाळी ४ वाजेपर्यंत प्राप्त झालेल्या राज्यातील कृषी उत्पन्न बाजार समितीनमधील उडीद बाजरभावानुसार आज कल्याण कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये तीन क्विंटल उडीदाची आवक झाली याकरिता किमान भाव 9500 कमाल भाव दहा हजार पाचशे तर सर्वसाधारण भाव हा दहा हजार रुपये इतका मिळाला आहे. सध्या बाजारात उडदाची आवक कमी असली तरी दर मात्र चांगले मिळत आहेत

    त्यामुळे तुरीचा दर जरी कमी झाला असला तरी उडीद बाजारात मात्र तेजी कायम असल्याचे दिसून येत आहे. शिवाय इतर कृषी उत्पन्न बाजार समितीमधील बाजार भाव आणि आवक पाहता आवक ही वाढलेली दिसून येत आहेत. आज सर्वाधिक उडीदाची आवक ही दुधनी कृषी उत्पन्न बाजार समिती येथे झाली असून ही अवक 254 क्विंटल इतकी झाली आहे. याकरिता किमान भाव 7350, कमाल भाव सात हजार पाचशे पाच आणि सर्वसाधारण भाव 7430 रुपये इतका मिळाला आहे.

    (महत्वाची टीप : ‘हॅलो कृषी’ द्वारा दिलेले शेतमाल बाजारभाव हे महाराष्ट्र राज्य कृषी पणन मंडळाच्या अधिकृत वेबसाईच्या माध्यमातून रोज अपडेट झालेले बाजारभाव असतात. याबाबत ‘हॅलो कृषी’ कोणताही दावा करीत नाही. दर सतत कमी जास्त होत असतात. त्यामुळे शेतकऱ्यांनी दराबाबत पुन्हा एकदा खात्री करून मगच बाजरात विक्रीसाठी माल न्यावा. )

    आजचे उडीद बाजारभाव

    29/08/2022
    पुणे क्विंटल 2 8400 9000 8700
    कारंजा क्विंटल 35 3540 4805 4500
    मंगळवेढा क्विंटल 3 6400 6400 6400
    बीड हायब्रीड क्विंटल 1 3435 3435 3435
    कल्याण हायब्रीड क्विंटल 3 9500 10500 10000
    वाशीम काळा क्विंटल 25 4500 7200 6000
    शेवगाव काळा क्विंटल 3 6101 6101 6101
    औराद शहाजानी काळा क्विंटल 2 7150 7150 7150
    तुळजापूर काळा क्विंटल 60 6100 7100 6800
    देवळा काळा क्विंटल 1 6805 6805 6805
    दुधणी काळा क्विंटल 254 7350 7505 7430
    अमरावती लोकल क्विंटल 3 3500 5300 4400
    मुंबई लोकल क्विंटल 77 6000 6500 6200
    जामखेड लोकल क्विंटल 11 4000 7200 5600
    मुरुम लोकल क्विंटल 12 5000 6666 5833
    उमरगा लोकल क्विंटल 1 4500 6000 5500