हॅलो कृषी ऑनलाईन : महाराष्ट्रातील शेतकऱ्यांना कधी अवकाळी पावसाचा फटका बसतो तर कधी बाजारात रास्त भाव मिळत नसल्यामुळे. त्याचबरोबर शेतकऱ्यांना कापसाला (Cotton) कमी भाव मिळत आहे. गतवर्षी कापसाला विक्रमी दर मिळाल्याचे शेतकऱ्यांचे म्हणणे आहे. त्यामुळे यंदा बहुतांश शेतकऱ्यांनी कापूस लागवडीवर भर दिला आहे. मात्र आता कापसाला सुरवातीलाच 6000 ते 7000 रुपये प्रतिक्विंटल भाव मिळत आहे.त्यामुळे पुढे काय होणार.त्याच बरोबर पावसामुळे पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे.त्यामुळे शेतकर्यांचे नुकसान होत आहे. दुहेरी नुकसान.
आधीच कपाशीचे (Cotton) तयार पीक अवकाळी पावसामुळे उद्ध्वस्त झाले असून, आता भावही कमी मिळत असल्याचे शेतकऱ्यांचे म्हणणे आहे. त्यामुळे नुकसान कसे भरून काढणार? जालना जिल्ह्यातील शेतकऱ्याने सांगितले की, पहिल्याच पावसात त्यांच्या 15 एकर कापूस पिकाचे नुकसान झाले असून उर्वरित उत्पादनाला कमी भाव मिळत आहे. आणि आजतागायत माझ्या नुकसान झालेल्या पिकांचा पंचनामा झालेला नाही.अशा परिस्थितीत आपण शेतकरी आर्थिक संकटात सापडलो आहोत.
Table of Contents
Toggleपावसात अधिक नुकसान झाले
भरीत कापूस पिकाचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाल्याचे शेतकऱ्यांचे म्हणणे आहे.त्याचबरोबर बाजारपेठेतील कापसाचे भावही खाली आले आहेत. यावेळी कापूस उत्पादक शेतकऱ्यांचे दुहेरी नुकसान होत आहे.कापसाला (Cotton) सुरुवातीला एवढा कमी भाव मिळत असेल तर पुढे काय होणार, असे शेतकरी सांगतात.त्याचबरोबर काही शेतकरी आतापासूनच कापूस साठवून ठेवण्याचा विचार करत आहेत.कापासोबतच सोयाबीनचे भावही प्रचंड घसरत आहेत.
कोणत्या बाजारात कापसाचा दर किती आहे? (Cotton)
28/10/2022 | ||||||
सावनेर | — | क्विंटल | 70 | 7800 | 7800 | 7800 |
वडवणी | — | क्विंटल | 20 | 6800 | 6800 | 6800 |
वरोरा-माढेली | मध्यम स्टेपल | क्विंटल | 18 | 7521 | 7551 | 7540 |
पुलगाव | मध्यम स्टेपल | क्विंटल | 360 | 8111 | 8111 | 8111 |
27/10/2022 | ||||||
सावनेर | — | क्विंटल | 50 | 7700 | 7700 | 7700 |
घणसावंगी | — | क्विंटल | 100 | 7000 | 7900 | 7500 |
वरोरा-माढेली | मध्यम स्टेपल | क्विंटल | 24 | 0 | 7551 | 0 |
पुलगाव | मध्यम स्टेपल | क्विंटल | 195 | 8001 | 8001 | 8001 |
25/10/2022 | ||||||
वरोरा-माढेली | मध्यम स्टेपल | क्विंटल | 13 | 7331 | 7551 | 7420 |
error: Content is protected !!