हॅलो कृषी ओनलाईन : परभणी
परभणी रब्बी हंगाम सन २०२१ – २२ मधील पिकांचे नैसर्गीक आपत्तीमुळे झालेल्या नुकसानी पोटी शेतकऱ्यांनी काढलेला पीक विमा शासनाने देऊ केला आहे. राज्य शासनाच्या हिश्याची १८७ कोटी १५ लाख ६५ हजार ७३ रुपये शासनाने विमा कंपन्यांना दिले आहेत. यामुळे शेतकऱ्यांना रब्बीतील पीक विमा मिळणे निश्चीत झाले असून सद्यस्थितीला आर्थिक संकटात उभे असलेल्या शेतकऱ्यांना हा दिलासा मिळाला आहे.
केंद्र व राज्य शासनाच्या संयुक्त भागीदारातुन प्रधानमंत्री पीक विमा योजना राबविल्या जाते. ज्या शेतकऱ्यांनी आपल्या पिकांचा विमा भरला आहे अशांना नुकसानीच्या प्रमाणात विम्याचा मावेजा दिला जातो. सन २०२१-२२ मधील रब्बी हंगामातील पिकांवर गारपीट त्याचप्रमाणे पावसाचे संकट ओढावले होते. अनेक पिकांचे शेतकऱ्यांच्या रब्बी हंगामातील अतोनात नुकसान झाले होते.
त्यामुळे झालेले नुकसान भरपाई व पीक विमा मिळाला पाहिजे अशी अपेक्षा शेतकऱ्यांमधुन व्यक्त करण्यात राजकीय पक्षांनी शेतकऱ्यांच्या पीक विमा प्रश्नावर आवाज उठविला होता. शासनाने झालेल्या नुकसानीचा विचार करता खरिपातील पाठोपाठ आता रब्बी हंगाम २०२१ – २२ मधील पीक विमाही देऊ केला आहे . यासाठी राज्य शासनाच्या हिश्याची असलेली १८७ कोटी १५ लाख हजार ७३ रुपयांची रक्कम भारतीय कृषी विमा कंपनी, इक्फो टोकीयो जनरल इन्शुरस कंपनी लि., भारती अॅक्सा जनरल इन्शुरस कं.लि., बजाज अलियान्स इन्शुरस कंपनी, एचडीएफसी अग्रो इन्शुरस कंपनी लि . या कंपन्यांना वितरीत करण्यात आली आहे. त्यामुळे येत्या काळात शेतकऱ्यांना रब्बी हंगामातील पीक विमा मिळणार आहे. ३० सप्टेंबर २०२२ अखेरपर्यंत या पीक विमा रक्कमेचे वाटप होणार असन येत्या रब्बी हंगामातील पेरणीसाठीबळीराजास या पीक विम्यातुन मोठा आधार मिळणार आहे .
शेतकऱ्यांना कार्यवाहीची प्रतिक्षा
राज्य शासनाने रब्बी हंगामातील पीक विमा देऊ केला आहे . त्यामुळे ज्या मागील वर्षी आपल्या पिकांचा विमा काढला आहे असे शेतकरी आता मिळणाऱ्या विम्याच्या प्रतिक्षेत आहेत . सततच्या पावसामुळे व पावसाच्या उघडीपीमुळे सुगीवर दुष्काळाचे सावट घोंगावत असल्याने आर्थिक संकटाची भिती शेतकरी बाळगत आहे . दरम्यान , शासनाकडून पीक विम्या संदर्भात कार्यवाहीला करुन शेतकऱ्यांना मोठा दिलासा दिला आहे.