यंदाच्या वर्षी करा कबुली हरभरा लागवड, जाणून घ्या

हॅलो कृषी ऑनलाईन : काबुली हरभरा लागवड सर्वसाधारण हरभऱ्याची लागवड बहुतेक वेळा घरगुती बियाण्याद्वारे जास्त प्रमाणात होते. असे असले तरी शहरी भागात काबुली हरभऱ्याची मागणी मोठ्या प्रमाणात असते. या हरभऱ्याला भाव सुद्धा जास्त मिळू शकतो. या प्रकारच्या हरभरा लागवडीसाठी अधिक अंतर सोडावे लागते, कारण या झाडाचा आकार मोठा असतो.

लागवड

साधारणपणे २० ऑक्टोंबर ते १० नोव्हेंबर हा कालावधी हरभरा लागवडीसाठी योग्य मानला जातो. या पिकाला फार खोल नांगरणी न करता, केवळ वखर पाळी मारून ४५ सेमी अंतरावर सरी पाडावी. वरंब्याच्या माथ्यावर टोकण पद्धतीने ४५ सेमी अंतरावर लागवड करावी.

बीजप्रक्रिया

लागवडीपूर्वी बियाणे प्रक्रिया करताना प्रति एक किलो बियाण्यास तीन ग्रॅम थायरम आणि ४ ग्रॅम ट्रायकोडर्मा चोळावे, बियाणे सावलीत सुकवून पुन्हा २५ ग्रॅम रायझोबियम आणि २५ ग्रॅम पीएसबी कल्चर चोळावे. पूर्व मशागत करताना शेणखत द्यावे.

पेरणी

पेरणी करताना एकरी ३० किलो युरिया आणि १५० किलो सुपर फॉस्फेट किंवा ५० किलो डीएपी द्यावे. सरी पाडलेली असल्याने मोकळे पाणी देता येते. तुषार सिंचनाची सोय असल्यास आणि परिणाम कारक आणि सोपे जाते. उगवणी नंतर फुलोरा आणि घाटे भरण्याच्या अवस्थेत नक्की पाणी द्यावे. ३० दिवसांनी युरियाची फवारणी केल्यास वाढीस फायदा होतो.

वाण

गुलकं – १ / पीकेव्ही काबुली – २ आणि पीकेव्ही काबुली – ४ तसेच विहार, हिरवा हरभरा (पीकेव्ही हरिता ), गुलाबी हरभरा ( गुलक- १ ), बीडीएनजी 797,विशाल, साकी 9516, दिग्विजय,जाकी ९२१८, विजय (Phule G -81-1-1)
हे वाण काबुली हरभऱ्याची प्रसिद्ध आहेत.

Comments

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *