हॅलो कृषी ऑनलाईन : राज्यभरात परतीचा पाऊस मोठ्या प्रमाणात झाला आहे. त्यामुळे काढणीस आलेल्या पिकांचे तसेच भाजीपाला पिकाचे देखील मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. वसंतराव नाईक मराठवाडा कृषि विद्यापीठ, परभणी येथील ग्रामीण कृषि मौसम सेवा योजनेतील तज्ञ समितीने पुढील प्रमाणे कृषि हवामान आधारीत कृषि सल्ल्याची शिफारश केली आहे.
१)तूर
–पाऊस झालेल्या ठिकाणी तुर पिकात साचलेल्या पाण्याचा निचरा करावा.
–तुर पिकात फायटोप्थोरा ब्लाईट प्रादूर्भाव दिसून आल्यास याच्या व्यवस्थापनासाठी वापसा येताच लवकरात लवकर ट्रायकोडर्मा 100 ग्रॅम प्रति 10 लिटर पाण्यात मिसळून खोडाभोवती आळवणी व खोडावर पावसाची उघाड बघून फवारणी करावी.
–तूर पिकावरील पाने गुंडाळणारी अळीच्या व्यवस्थापनासाठी 5% निंबोळी अर्काची किंवा क्विनॉलफॉस 25% 16 मिली प्रति 10 लिटर पाण्यात मिसळून पावसाची उघाड बघून फवारणी करावी.
२)भाजीपाला पिके
–पाऊस झालेल्या ठिकाणी भाजीपाला पिकात साचलेल्या पाण्याचा निचरा करावा.
–टोमॅटो पिकावरील करपा याच्या व्यवस्थापनासाठी ॲझोऑक्सीस्ट्रोबीन 18.2% + डायफेनकोनॅझोल 11.4% एससी 10 मिली प्रति 10 लिटर पाण्यात मिसळून पावसाची उघाड बघून फवारणी करावी.
–काकडीवर्गीय भाजीपाला पिकात डाउनी मिल्ड्यू चा प्रादूर्भाव दिसून येत असल्यास याच्या व्यवस्थापनासाठी अझोऑक्सीस्ट्रोबिन 23% एससी 2.5 ग्रॅम प्रति 10 लिटर पाण्यात मिसळून पावसाची उघाड बघून फवारणी करावी.
— भाजीपाला (मिरची, वांगे व भेंडी) पिकात रसशोषण करणाऱ्या किडींच्या व्यस्थापनासाठी लिकॅनीसिलीयम लिकॅनी (जैविक बुरशीजन्य किटकनाशक) 40 मिली किंवा पायरीप्रॉक्सीफेन 5% + फेनप्रोपाथ्रीन 15% 10 मीली किंवा डायमेथोएट 30% 13 मीली प्रती 10 लिटर पाण्यात मिसळून पावसाची उघाड बघून फवारणी करावी.
–काढणीस तयार असलेल्या भाजीपाला पिकांची काढणी करून घ्यावी. जमिनीत वापसा येताच भाजीपाला पिकात अंतरमशागतीची कामे करून तण नियंत्रण करावे.