हॅलो कृषी ऑनलाईन : पाथरी ता . प्रतिनिधी
परतीच्या पावसाने परभणी जिल्ह्यासह पाथरी तालुक्यात सोयाबीन कापूस या खरीप पिकांचे प्रचंड नुकसान झाले असल्यामुळे जिल्ह्यातील शेतकऱ्यांना नुकसानीचे पंचनामे करण्याऐवजी सरसकट पिक विमा देत ओला दुष्काळ जाहीर करावा अशी मागणी पाथरी वकील संघाच्या वतीने प्रशासनाकडे करण्यात आली आहे .या संदर्भात बुधवारी तहसीलदारांना निवेदन देण्यात आले आहे.
पाथरी वकील संघाच्या वतीने बुधवार 19 ऑक्टोबर रोजी महसूल प्रशासनाला निवेदन देण्यात आले आहे यामध्ये म्हटले आहे की ,मागील काही दिवसापासून परभणी जिल्हा व पाथरी तालुक्यात परतीच्या पावसाने सोयाबीन कापूस या खरीप पिकांचे प्रचंड नुकसान झाले असल्यामुळे व रब्बी पेरणीचा हंगाम सुरू झाला असल्यामुळे पीक नुकसानीचे पंचनामे करण्याऐवजी पाथरी तालुक्यात सरसकट ओला दुष्काळ जाहीर करून बाधित शेतकऱ्यांना पीक विमा व नुकसान भरपाई त्वरित देण्यात यावी अशी मागणी केली आहे . यावेळी मागील 5 दिवसापासून तहसील कार्यालयासमोर उपोषणास बसलेल्या शेतकरी बांधवांच्या मागण्या शासनाने मान्य कराव्यात सोबतच या आंदोलनास पाठिंबा असल्याचे ही दिलेल्या निवेदनात म्हंटले आहे .
यावेळी निवेदनावर पाथरी वकील संघाचे अध्यक्ष एडवोकेट बी . इ . दाभाडे , सचिव एडवोकेट बी .एल .रोकडे ,एडवोकेट व्ही . एस .गात ,एडवोकेट डी .बी . निसरगंध ,एडवोकेट डी . टी . मगर ,एडवोकेट बी .पी . चव्हाण , ऍड. आर . व्ही .गिराम यांच्या स्वाक्षऱ्या आहेत.