पाथरी तालुक्यातील सर्व महसुल मंडळांचा 25 टक्के पिकविमा अग्रीम अधिसुचनेत समावेश करण्याची मागणी

हॅलो कृषी ऑनलाईन : परभणी प्रतिनिधी

पिकविमा सर्वेक्षणात केवळ पर्जन्यमान या बाबीचा अहवाल ग्राह्य धरल्याने व पाथरी तालुक्यात असणारे मंडळनिहाय पर्जन्यमापके व त्यांचे अंतर , संख्या पाहता तालुक्याचे पर्जन्यमान अहवाल काढणे योग्य नाही म्हणत तालुक्यातील चारही महसूल मंडळांचा 25 टक्के पीक विमा अग्रीम साठी अधिसूचनेत समावेश करावा अशी मागणी राष्ट्रवादी काँग्रेसचे ओबीसी सेल अध्यक्ष तथा परभणी जिल्हा मध्यवर्ती बँकेचे संचालक दत्तराव मायंदळे यांनी तहसील प्रशासनाला दिलेल्या निवेदनात केली आहे .

शुक्रवार 16 सप्टेंबर रोजी राकाँ चे ओबीसी सेल अध्यक्ष दत्तराव मांयदळे यांच्यासह 50 हून अधिक शेतकऱ्यांच्या शिष्टमंडळाने पाथरी तहसील प्रशासनाला पिक विमा अग्रीम देण्यातून चारही मंडळाला चुकीच्या निकषाने वगळल्याचे निदर्शनास आणून देत या सर्व महसूल मंडळांचा अधिसूचनेत समावेश करावा या मागणीचे निवेदन दिले आहे .

यावेळी दिलेल्या निवेदनात म्हटले आहे की, जिल्हाधिकार्यांनी पिकविमा 25 टक्के अग्रीम देण्याकरीता सर्वेक्षण करण्यासाठी अधिसुचना काढतांना पिक परिस्थिती अहवाल , प्रर्जन्यमान अहवाल , स्थानिक प्रसार माध्यमांचा अहवाल दुष्काळ जन्य परिस्थिती आदी बांबींचा विचार करणे आवश्यक होता . परंतु जिल्हाधिकारी यांनी ही अधिसुचना काढतांना केवळ प्रर्जन्यमान अहवालाचा विचार केलेला दिसत आहे . आणि प्रर्जन्यमान अहवाल तयार करतांना प्रत्येक महसुल मंडळात केवळ 1 प्रर्जन्यमापक यंत्र बसविलेले आहे . त्यात एका यंत्राच्या आधारे तालुक्यातील महसुल मंडळाचे प्रर्जन्यमान अहवाल तयार करणे संयुक्तीक नाही नसल्याने म्हणत चुकीचे आहे असे म्हटले आहे . त्यामुळे अहवालाचा हा एकमेव निकष ग्रहीत न धरता इतर बाबींचा ही विचार करुन पाथरी तालुक्यातील चारही महसुल मंडळाचा 25 % विमा अग्रीम अधिसुचनेत ग्रहीत धरावे अशी मागणी केली आहे . अन्यथा पाथरी चारही महसुल मंडळातील शेतकरी तहसील कार्यालयासमोर आंदोलन करतील असा इशारा दिला आहे .

See also  तेजस्वी यादव दिल्ली रवाना, लालू से मिलकर तय करेंगे कौन-कौन बनेंगे मंत्री?, लेंगे पिता का आशीर्वाद और बंधवायेंगे बहन से राखी

दरम्यान पाथरी तालुक्यातील सर्व गावांमध्ये जनावरामध्ये लम्पी त्वचा रोगामुळे पशूपालकासह इतर नागरीकांमध्ये देखील धडकी भरली आहे हे निदर्शनास आणून देत या आजारामूळे जनावरे दगावतात, जनावरांची जिवीत हानी होऊ नये याकरीता लम्पी रोग लसीकरण मोहीम तात्काळ राबविण्यात यावी अशीही मागणी निवेदन देत यावेळी करण्यात आली आहे. दिलेल्या निवेदनावर चारही महसूल मंडळातील 50 हून अधिक शेतकऱ्यांच्या स्वाक्षरी आहेत .

Leave a Comment