हॅलो कृषी ऑनलाईन : पाथरी ता . प्रतिनिधी
परभणी जिल्ह्याच्या जिल्हाधिकारी आंचल गोयल यांनी बुधवार 12 ऑक्टोबर रोजी पाथरी तालुक्यातील वाघाळा रेणापुर या गावांमध्ये भेट देत ई – पिक पाहणी केली . यावेळेस स्थानिक शेतकऱ्यांशी त्यांनी चर्चा करत 15 ऑक्टोबर पर्यंत ई -पिक पाहणी करून घेण्याचे आवाहन केले .यासोबतच उर्वरित शेतकऱ्यांना ई -पिक पाहणी करण्यास मदत करण्यासंदर्भात महसूल प्रशासनाला निर्देश दिले .
जिल्हाधिकारी आंचल गोयल यांनी सकाळी ९.३० ते ११ वा दरम्यान पाथरी तालुक्यातील रेनापुर ,वाघाळा शिवारामध्ये असणाऱ्या पिकांची पाहणी करत शेतकर्याची ई -पीक अँप द्वारे पाहणी व नोंद केली .रेनापुर येथे आशश्रोबा नबाजी आव्हाड यांच्या शेतामध्ये त्यांचा मुलगा सखाराम आव्हाड यांच्या मोबाईलवर ई-पिक नोंद करून शेतकऱ्यांना मार्गदर्शन केले . तर वाघाळा येथेही त्यांनी गावातील अर्ध्या अधिक शेतकऱ्यांचे पीक पाहणी नोंद झाली नसल्याचे निदर्शनास आणून देत पुढील तीन दिवसात नोंदणी करून घेण्यासंदर्भात सूचना केल्या.
यावेळी स्थानिक शेतकऱ्यांनी त्यांना परतीच्या पावसाने झालेल्या नुकसानी संदर्भात निवेदन दिले आहे . यावेळी उपविभागीय अधिकारी शैलेश लाहोटी , तहसीलदार सुमन मोरे ,तलाठी दीक्षित , तलाठी कुलकर्णी मा .सभापती दादासाहेब टेंगसे ,सरपंच बंटी घुंबरे , सरपंच चोखोबा उजगरे , संदीप टेंगसे लक्ष्मणराव टेंगसे , अनुप घुंबरे .पद्माकर मोकाशे ,माणिकआप्पा घुंबरे , राजेभाऊ वनकळसे , सुदामराव घुंबरे आदींची उपस्थिती होती.