पाकिस्तानात कांदा आणि टोमॅटोची निर्यात करा; शेतकऱ्यांना दिलासा देण्यासाठी पंतप्रधानांना पत्र

Pakistan Flood

हॅलो कृषी ऑनलाईन : सध्याचे पाकिस्तानातील चित्र पाहता पाकिस्तान मध्ये महागाईचा आगडोंब उसळला आहे पाकिस्तानात सध्या पूर परिस्थिती आहे. त्यामुळे पाकिस्तानातील जनजीवन मोठ्या प्रमाणात विस्कळीत झाले आहे. त्यामुळे पाकिस्तानात कांदा आणि टोमॅटोची निर्यात त्वरित सुरू करावी अशी मागणी स्वतंत्र भारत पार्टीने केली आहे.

पाकिस्तानात भारतातून तातडीने निर्यात सुरू करून भारतातील कांदा आणि टोमॅटो उत्पादक शेतकऱ्यांना दिलासा द्यावा अशी मागणी स्वतंत्र भारत पार्टीचे राष्ट्रीय अध्यक्ष अनिल घनवट यांनी केली आहे त्याबाबत त्यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यासह परराष्ट्र व्यवहार मंत्र्यांना पत्र पाठवले आहे.

पाकिस्तानात इतर गरजेच्या वस्तूंसह कांदा आणि टोमॅटो यांच्या दरामध्ये मोठी वाढ झाली आहे. पाकिस्तानात कांद्याचे दर हे 400 रुपये प्रति किलो तर टोमॅटोचे दर हे 500 रुपये प्रति किलो वर आले आहेत. एवढेच नाही तर हे दर आता 700 रुपये प्रति किलो पर्यंत वाढण्याची शक्यताही वर्तवली जात आहे. पाकिस्तानातील व्यापारी वर्ग भारतामधून कांदा आणि टोमॅटोची आयात करण्याची मागणी पाकिस्तान सरकारकडे करत आहे. भारतात मात्र कांद्याचे आणि टोमॅटोचे दर हे अद्यापही उत्पादन खर्चापेक्षा कमी आहेत. कांदा चाळींमध्ये सडतो आहे तर टोमॅटो रस्त्यावर फेकले जात आहेत. अशा परिस्थितीमध्ये भारताने पाकिस्तानला कांदा आणि टोमॅटोचे निर्यात करण्याचा निर्णय घ्यावा अशी मागणी भारतातील शेतकऱ्यांच्या वतीने केंद्र शासनाकडून करण्यात आली असल्याची माहिती अनिल घनवट यांनी एका मराठी वृत्तवाहिनीशी बोलताना दिली आहे.

Join WhatsApp Group
See also  युवक को आर्केस्ट्रा में नाचने वाली से हो गई थी मोहब्बत आज मिला शव

Leave a Comment