पाऊस झाला गायब ! परभणी जिल्ह्यातील शेतकरी पावसाच्या प्रतिक्षेत; फुलोर्‍यातील पिके टाकतायेत माना




पाऊस झाला गायब ! परभणी जिल्ह्यातील शेतकरी पावसाच्या प्रतिक्षेत; फुलोर्‍यातील पिके टाकतायेत माना | Hello Krushi












































हॅलो कृषी ऑनलाईन : परभणी प्रतिनिधी

परभणी जिल्ह्यात मागील पंधरा दिवसांपासून पावसाने दडी मारल्याने खरिप हंगाम धोक्यात आला आहे. मागील वर्षी सरासरी पेक्षा जास्त पाऊस झाल्याने खरीप पिके हातची गेल्याने जिल्हातील शेतकरी आर्थिक संकटात पडला होता. यातुन यावर्षीचा हंगाम बाहेर काढेल असे वाटत असताना सुरुवातीला सतत पडणारा पाऊस गरज असताना मात्र गायब झाला आहे. जिल्ह्यातील खरिप हंगामातील कापुस , सोयाबीन पिके फुल अवस्थेत असुन यावेळी पावसाची मोठी गरज आहे. विहीर बोअरवेल माध्यमांतून पाण्याची सोय असणारे शेतकरी स्पिंकलर, ठिंबक व पाटपाणी देत पिके जोपासणाच्या प्रयत्न करीत आहेत. मात्र कोरडवाहू शेतकरी हतबल झाला आहे. जिल्ह्यात यावर्षी अधिच पर्जन्यमान असमान झाले आहे. काही महसुल मंडळात सरासरी पेक्षा अधिक तर काही मंडळात कमी पाऊस पडला आहे. अधिक पाऊस झालेल्या ठिकाणी पिकांना पाण्याची गरज असताना कमी पर्जन्यमान असणाऱ्या मंडळात स्थिती अधिक बिकट आहे .

उदाहरणार्थ जिल्ह्यातील पाथरी तालुक्यातील दोन महसूल मंडळामध्ये यंदा सरासरीपेक्षा कमी पाऊस झाला आहे . यात कासापूरी व हादगाव महसुल मंडळाचा समावेश आहे. पाथरी तालुक्यात जून पासून ऑगस्टपर्यंत सरासरी 470 मिलिमीटर एवढा पाऊस पडत असतो .यंदा तो अर्ध्या तालुक्यामध्ये सरासरी पेक्षा जास्त तर अर्ध्या तालुक्यांमध्ये सरासरीपेक्षा कमी पडला आहे .प्रशासनाकडून मिळालेल्या पर्जन्यमान अहवालानुसार पाथरी तालुक्यातील कासापुरी महसूल मंडळामध्ये जून पासून आतापर्यंत 262 मिलिमीटर पाऊस पडला असून तो सरासरीच्या 55 टक्के एवढा आहे. तर अशीच काही परिस्थिती शेजारील हादगाव महसूल मंडळामध्ये आहे. या ठिकाणी सरासरीच्या 69 टक्के एवढाच पाऊस झाला आहे .याचा परिणाम म्हणून खरिपातील पिकांना आता मोठ्या पावसाची अथवा जायकवाडी धरणातून पाणी आवर्तनाची मोठी गरज आहे .जूनच्या सुरुवातीपासूनच या दोन महसूल मंडळाला पावसाने पाठ दाखवल्याने शेतकरी अडचणी सापडला आहे.

See also  Ola की छुट्टी करने आ गई Hero का पहला दमदार Electric Scooter, मिलेगी 165Km की रेंज..

याउलट पाथरी महसूल मंडळ व बाभळगाव महसुल मंडळा मध्ये जून पासून ऑगस्ट पर्यंत सरासरीपेक्षा जास्त पाऊस झाल्याचे पाहायला मिळत आहे .
अनुक्रमे 106 . 9 टक्के व 103 . 8 टक्के असा सरासरीपेक्षा जास्त पाऊस या दोन महसूल मंडळामध्ये पडला आहे. त्यामुळे एकाच हंगामात पाथरी तालुक्यातील उत्तर व दक्षिण भागांमध्ये पावसाचे असमान पर्जन्यमान झाल्याने एकीकडे अधिकच्या पावसाने पिके खराब होत असून दुसरीकडे पावसाअभावी पिके माना टाकत आहेत. सध्या जायकवाडी धरणातून गोदावरी नदीपात्रात पाण्याचा विसर्ग चालू आहे. असा विसर्ग डाव्या कालव्यात केल्यास पिकांना संजीवनी देता येईल. स्थानिक शेतकरी जायकवाडीतून कॅनॉलला पाणी सोडण्यात यावे अशी मागणी करत आहेत .





error: Content is protected !!





Leave a Comment