हॅलो कृषी ऑनलाईन : यंदाच्या वर्षी राज्यतल्या अनेक भागांना अतिवृष्टीचा मोठा अटक बसला आहे. त्यामुळे ऐन खरिपात शेती पिकांचे मोठे नुकसान झाले आहे. हिंगोली जिल्हा देखील याला अपवाद नाही. या जिल्ह्यात जूलै आणि ऑगस्ट महिन्यात जोरदार पाऊस झाला. त्यामुळे शेतीचे मोठे नुकसान झाले. त्यानंतर राज्यशासनाकडून अतिवृष्टीग्रस्त शेतकऱ्यांना मदत देण्याचे जाहीर करण्यात आले. काही भागात मदत मिळवायला सुरुवातही झाली आहे. मात्र हिंगोलीतील सेनगाव तालुक्यातील तीन मंडळांना अद्यापही मदत मिळाली नाही. याच कारणामुळे मागच्या ६ दिवसांपासून गोरेगाव येथील शेतकरी संपावर गेले आहेत. मात्र आज शेतकऱ्यांमध्ये संताप वाढलेला दिसून आला शेतकरी आक्रमक झाल्याचे पाहायला मिळाले. येथील शेतकऱ्यांनी रस्त्यावर दूध ओतून राज्य सरकारचा निषेध केला.
हिंगोली जिल्ह्यातल्या सेनगाव तालुक्यातल्या तीन मंडळांना शासनाच्या मदतीपासून वंचित राहावं लागलं आहे. पावसामुळे प्रत्यक्षात पिकांचे मोठं नुकसान झालं असताना प्रशासनाने मात्र इथे अतिवृष्टी झाली नसल्याचा दावा केलाय. त्यामुळे या भागातील जवळपास 40 ते 45 गावातील शेतकऱ्यांना शासनापासून मिळणाऱ्या मदतीपासून वंचित राहावं लागलं आहे.
त्यामुळे गेल्या सहा दिवसांपासून गोरेगाव येथील शेतकरी संपावर गेले आहेत. आज येथील शेतकऱ्यांचा आक्रमक रूप पाहायला मिळालं शेतकऱ्यांनी रस्त्यावर दूध ओतून देत राज्य शासनाचा निषेध व्यक्त केला सेनगाव तालुक्यातील मदतीपासून वंचित असलेल्या या गावांचा तात्काळ नुकसानग्रस्त असलेल्या गावांचे यादीत समावेश करावा आणि तात्काळ मदत करावी अशी मागणी यावेळी शेतकऱ्यांनी केली आहे.