खत न मिळाल्याने शेतकरी नाराज, कृषी सल्लागाराला बांधले खांबाला

हॅलो कृषी ऑनलाईन : आजचे युग हे सोशल मीडियाचे युग असून दररोज काही ना काही व्हिडीओ व्हायरल होत असतात. आजही एक व्हिडिओ व्हायरल होत आहे. हा व्हिडीओ बिहारच्या मोतिहारी जिल्ह्यातील असून खते न मिळाल्याने शेतकरी संतप्त झाले आणि त्यांनी कृषी सल्लागाराला खांबाला बांधले. हा व्हिडिओ एनडीटीव्हीच्या पत्रकाराने सोशल मीडियावर शेअर केला आहे.

व्हिडीओमध्ये स्पष्टपणे दिसत आहे की, खांबाला बांधलेली व्यक्ती फोनवर कोणाशी तरी आपली स्थिती शेअर करत आहे. एनडीटीव्हीने दिलेल्या माहितीनुसार खतांच्या काळाबाजारामुळे नाराज होऊन शेतकऱ्यांनी हे पाऊल उचलले आहे. देशात सध्या खरीप हंगाम सुरू आहे. अशा परिस्थितीत शेतकऱ्यांना खतांची गरज मोठ्या प्रमाणावर आहे.

व्हायरल व्हिडिओवर अनेक प्रकारच्या कमेंट्स पाहायला मिळत आहेत, आतापर्यंत 34 हजारांहून अधिक लोकांनी हा व्हिडिओ पाहिला आहे आणि लोक खूप कमेंट करत आहेत. एका सोशल मीडिया वापरकर्त्याने लिहिले आहे की – बिहारची ही रोजची गोष्ट आहे आणि शेतकऱ्यांना खत मिळत नसल्याबद्दलचा त्यांचा संताप न्याय्य आहे.

Comments

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *