तानाजी सावंतांनी आमच्या हातात चाॅकलेट ठेवलं; पीक विम्याच्या मागणीवरून शेतकरी संतापले





तानाजी सावंतांनी आमच्या हातात चाॅकलेट ठेवलं; पीक विम्याच्या मागणीवरून शेतकरी संतापले | Hello Krushi













































हॅलो कृषी ऑनलाईन : मागील ८ दिवसांपासून राज्यभरात परतीच्या पावसाने धुमाकूळ घातला आहे. त्यामुळे ऐन काढणीला आलेल्या सोयाबीन कापूस आणि इतर पिकांचे मोठे नुकनं झाले आहे. म्हणूनच पीक विम्याच्या मागणीसाठी पाथरी येथे मागील ४ दिवसांपासून शेतकऱ्यांनी उपोषण सुरु केले आहे. या उपोषणकर्त्यांशी फोनवरून संवाद साधत पालकमंत्री तानाजी सावंत यांनी यावर मार्ग काढण्याचे आश्वसन दिले होते. मात्र या आश्वसनाचे केवळ चॉकलेटचं हातात ठेवले असून प्रत्यक्षात मात्र काहीच घडत नसल्यामुळे शेतकऱ्यांनी आता उपोषणाचे रूपांतर आंदोलनात केले आहे. आज अर्धनग्न होऊन बोंबाबोंब आंदोलन करण्यात आले.

पालकमंत्री तानाजी सावंत यांचे आश्वसन

14 ऑक्टोबर रोजी या भागात जोरदार पाऊस झाल्यानंतर 15 ऑक्टोबर पासून बेमुदत उपोषण सुरू करण्यात आले. त्यानंतर परभणी जिल्ह्याचे पालकमंत्री तानाजी सावंत यांना युवा सेना जिल्हाप्रमुख शिंदे गट दीपक टेंसे यांच्या मदतीने कॉन्फरन्स कॉल करत उपोषणकर्त्यांशी थेट संपर्क साधला. यावेळी शेतकऱ्यांनी जिल्ह्यात झालेल्या अतिवृष्टी नंतर शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाले असून सरकारने लक्ष देण्याची मागणी केली. यावेळी तानाजी सावंत यांनी शनिवारी रात्री साडेनऊ वाजण्याच्या सुमारास परभणी जिल्ह्यातील अतिवृष्टी संदर्भात बातम्या पाहिल्या त्याच दिवशी पाहिले शेतकऱ्यांचे फोन आले असून पंचनामे करण्याचे आदेश दिले आहेत. या संदर्भात माहिती घेतली असून उद्याच्या कॅबिनेट मीटिंगमध्ये अतिवृष्टीचा विषय मांडणार असल्याचा शेतकऱ्यांना सांगितलं. मात्र प्रत्यक्षात आतापर्यंत काहीच ठोस पावलं उचलली गेली नसल्यामुळे उपोषण कर्त्यांमध्ये नाराजीचा सूर आहे. शेतकऱ्यांनी संतप्त होऊन आता आंदोलनाचे हत्यार उपसले आहे. पालकमंत्री तानाजी सावंत यांनी केवळ आमच्या हातात चॉकलेटच ठेवलं अशी प्रतिक्रिया शेतकऱ्यांमधून उमटत आहे.

See also  PMSBY : महज 20 रुपये सालाना में मिलता है 2 लाख का बीमा, जानें – क्या है सरकारी योजना..

शिवाय जोपर्यंत ओला दुष्काळ जाहीर करत नाही आणि पीक विमा उतरवला जात नाही. तोपर्यंत हे आंदोलन चालूच राहणार किंबहुना हे आंदोलन अधिक तीव्र करणार असल्याचं इथल्या शेतकऱ्यांनी सांगितले आहे. आज अर्धनग्न होत बोंबाबोंब आंदोलन करण्यात आले आहे तर उद्या जलसमाधी आंदोलन करण्यात येईल अशी माहिती इथल्या शेतकऱ्यांनी दिली आहे.

दिवाळी साजरी कशी करायची ?

दिवाळी सण तोंडावर आला असताना शेतकऱ्याच्या हातात काहीच नाही अशी प्रतिक्रिया देखील इथल्या शेतकऱ्यांनी व्यक्त केली आहे. आम्ही दिवाळी सण साजरा करायचा की नाही ? असा सवाल देखील इथल्या शेतकऱ्यांनी उपस्थित केला आहे. लवकरात लवकर आमच्या मागण्या पूर्ण झाल्या पाहिजे आणि प्रशासनाने यात लक्ष घातलं पाहिजे अशी मागणी इथल्या आंदोलनकर्त्यांनी केली आहे.

error: Content is protected !!





Leave a Comment