हॅलो कृषी ऑनलाईन : राज्यात हळदीचे उत्पादन मोठ्या प्रमाणावर घेतले जाते. त्यातही हळदीचे सर्वाधिक उत्पादन हिंगोली जिल्ह्यात घेतले जाते. हळदीसाठी ओळखल्या जाणाऱ्या हिंगोली जिल्ह्यात आता बाळासाहेब ठाकरे हळद संशोधन केंद्र उभारले जाणार आहे. याबाबत शासन निर्णय जरी झाला असून या संशोधन केंद्रासाठी १०० कोटी रुपयांचा निधी मंजूर करण्यात आला आहे. विशेष म्हणजे चालू आर्थिक वर्षात १० कोटी रुपयांचा निधी उपलब्ध होणार आहे.
महाविकास आघाडी सरकारनं 2022 च्या अर्थसंकल्पीय अधिवेशनामध्ये बाळासाहेब ठाकरे हळद संशोधन केंद्राला मंजुरी दिली होती. त्यानंतर आता शिंदे सरकार स्थापन होताच या संशोधन केंद्रासंदर्भात शासन निर्णय करण्यात आला आहे. 14 सप्टेंबला हा शासानिर्णय काढण्यात आला आहे. चालू आर्थिक वर्षांमध्ये दहा कोटी रुपये निधी वितरित करत असल्याची माहिती या शासन निर्णयात आहे. हिंगोली जिल्ह्यातील वसमत तालुक्यात हे हळद संशोधन केंद्र उभारले जाणार आहे. बाळासाहेब ठाकरे हळद संशोधन व प्रशिक्षण केंद्र या नावाने हे संशोधनं केंद्र उभारले जाणार आहे.
भारतीय हळदीला मोठी मागणी
–भारतीय हळदीला जगभरातून मागणी वाढत आहे. यंदा देशातून हळदीची विक्रमी निर्यात होण्याची शक्यता वर्तवली जात आहे.
–यंदा देशातून 2 लाख टन हळदीच्या निर्यात होण्याची शक्यता आहे.
–गेल्या तीन वर्षापासून हळद निर्यातीत भारताचे आकडे वाढत असल्याचे दिसत आहे.
— गेल्या वर्षी देशातून 1 लाख 83 हजार 868 टन हळदीची निर्यात झाली होती.
— यंदा वर्ष अखेपर्यंत दोन लाख टनांहून अधिक हळदीची निर्यात शक्य असल्याचा अंदाज व्यक्त करण्यात येत आहे.