हॅलो कृषी ऑनलाईन : पाथरी ता प्रतिनिधी
शुक्रवारी दिवसभर झालेल्या अतिवृष्टी मुळे खरिपातील सोयाबीन ,कापूस पिकाचे मोठे नुकसान झाले असल्याने ओला दुष्काळ जाहीर करावा व खरीपातील काढणी चालू असलेल्या पिकांच्या नुकसान भरपाई पोटी शेतकऱ्यांना तात्काळ अनुदान व पिक विमा देण्यात यावा या मागणीसाठी पाथरी तहसील कार्यालयासमोर शनिवार 15 ऑक्टोबर पासून तालुक्यातील शेतकऱ्यांसह युवक काँग्रेस, राष्ट्रवादी युवक काँग्रेस व युवासेना यांच्या वतीने बेमुदत उपोषण सुरू करण्यात आले आहे. यावेळी महसूल प्रशासनाला निवेदन देण्यात आले आहे.
मागील काही दिवसापासून पाथरी तालुक्यातील शेत शिवारात झालेल्या परतीच्या पावसाने खरीपातील काढणी चालू असलेल्या पिकांचे मोठे नुकसान झाले आहे .त्यात शुक्रवारी दिवसभर ढगफुटी सदृश्य पाऊस झाला .त्यामुळे पाथरी तालुक्यातील चारही महसूल मंडळातील शेतांना तळ्याचे स्वरूप आले होते . यामध्ये खरीपात काढणी सुरु असलेल्या सोयाबीन पिकाचे मोठे नुकसान झाले आहे . यासंदर्भात शनिवार १५ ऑक्टोबर रोजी सकाळी महसुल प्रशासनाला शेतकऱ्यांसह युवक काँग्रेस , राष्ट्रवादी युवक काँग्रेस व युवासेना ( ठाकरे गट ) यांनी ओला दुष्काळ जाहीर करून पंचनामे ,निकष न लावता थेट हेक्टरी १ लाख रुपये मदत जाहीर अशी निवेदनातुन मागणी केली आहे . सोबतच मागणी पूर्ण होत नाही तोपर्यंत उपोषण करण्याचा निर्णय घेतला आहे. पक्षीय कार्यकर्त्यांसह स्थानिक अतिवृष्टीग्रस्त शेतकरी आता तहसील कार्यालया समोर उपोषणाला बसले आहेत . मागण्या मान्य झाल्याशिवाय उपोषण सोडणार नसल्याची भुमिका यावेळी उपोषणकर्त्यांनी घेतली आहे.
यावेळी दिलेल्या निवेदनात म्हटले आहे की, काही दिवसापासुन पाथरी तालुक्यातील सर्व मंडळात परतीच्या पावसाने धुमाकुळ घातला आहे . त्यामुळे शेतकऱ्यांच्या हातातोंडाशी आलेले पिकाचे आतोनात नुकसान झाले आहे . त्यामुळे शेतकऱ्याला आत्महत्या करण्याशिवाय पर्याय नाही . या आसमानी संकटातुन शेतकऱ्यांना वाचवण्यासाठी शासनानी पिक विमा व ओला दुष्काळ तात्काळ जाहिर करुण हेक्टरी 1 लाख मदत जाहिर करावी . सदरील मदत कोणतेही निकष व पंचनामे न करता जाहिर करत तात्काळ शेतकऱ्यांच्या खात्यावर वर्ग करावी .अशी मागणी केली आहे. जोपर्यंत ही मदत शासन जाहिर करत नाही तो पर्यंत तालुक्यातील सर्व शेतकऱ्यांच्या वतीणे शनिवार १५ ऑक्टोबर पासुन उपोषन करण्यात येणार आहे असा इशारा यावेळी देण्यात आला आहे .
उपोषण स्थळी तालुक्यातील शेतकरी यांच्यासह युवा सेनेचे पांडुरंग शिंदे, युवक काँग्रेसचे महेश कोल्हे, राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे विष्णू काळे, संदीप टेंगसे, माजी पं.स.सभापती राजेश ढगे, माणिकअप्पा घुंबरे ,अमोल भाले पाटील, सुनील पितळे, शरद कोल्हे, ज्ञानेश्वर शिंदे, परमेश्वर नवले, राजु नवघरे, सुर्यकांत नाईकवाडे, पांडूरंग सोनवण, अविराज टाकळकर, प्रताप शिंदे, ऍड बी .जी . गायकवाड, अमृत अडसकर, सिध्देश्वर इंगळे, ऋषीकेश नाईक, महारुद्र वाकणकर, कृष्णा गलबे,आदी शेतकरी मोठ्या संख्येने साखळी पद्धतीने उपोषण करणार आहेत .