खुशखबर ! जळगावात कापसाच्या मुहुर्तालाच मिळाला 16 हजार रुपये प्रति क्विंटलचा दर




खुशखबर ! जळगावात कापसाच्या मुहुर्तालाच मिळाला 16 हजार रुपये प्रति क्विंटलचा दर | Hello Krushi








































हॅलो कृषी ऑनलाईन : मागील वर्षांपासून कापसाला चांगला भाव शेतकऱ्यांना मिळत आहे. यंदाच्या खरिपात देखील कापसाची चांगली लागवड करण्यात आली असून शेतकऱ्यांना चांगला भाव मिळण्याची अपेक्षा आहे.अशातच कापूस उत्पदक शेतकऱ्यांसाठी एक खुशखबर आहे. जळगावातल्या बोदवड बाजारपेठ मध्ये कापसाला मुहुर्तालाच 16 हजार रुपये प्रति क्विंटलचा दर मिळाला आहे. त्यामुळे शेतकऱ्यांच्यात आनंदाचे वातावरण आहे.

केळीनंतर जळगावात कापसाचेही चांगले उत्पादन घेतले जाते. जळगावातील बोदवड इथेही खरेदीचा मुहूर्त करण्यात आला. यावेळी सातगाव डोंगरी बाजार पेठेत विक्रमी असा सोळा हजार रुपये प्रति क्विंटल भाव काढण्यात आला आहे. मात्र, केवळ 67 किलो कापूस या ठिकाणी खरेदी करण्यात आला. सोळा हजार हा भाव कायम राहणार नसला तरी दहा ते अकरा हजार रुपये प्रति क्विंटल भाव हा कायम राहण्याची शक्यता असल्याने शेतकऱ्यांच्या मध्ये समाधान आहे.
कापूस खरेदीचा हंगाम अजून सुरु व्हायचा असला तरी अनंत चतुर्थी निमित्ताने कापूस खरेदी करण्याची खानदेशात परंपरा आहे. या परंपरेनुसार काल (31 ऑगस्ट) धरणगाव जिनिंग असो तर्फे कापूस खरेदी मुहूर्त करण्यात आला.

कोणत्या बाजारपेठेत किती दर मिळाला

See also  Lumpy : सावधान ! महाराष्ट्रातही ‘लम्पी’ चा शिरकाव; काय घ्याल काळजी ?

बोदवड बाजारपेठ: 16000 रुपये
सातगाव डोंगरी : 14 हजार 772 रुपये
बाळद : 11 हजार 551 रुपये
धरणगाव : 11 हजार 153 रुपये
कासोदा : 11011 रुपये
कजगाव : 11000 रुपये

 

error: Content is protected !!





Leave a Comment