वन्य प्राण्यांच्या हल्ल्यात मिळणाऱ्या नुकसान भरपाईत वाढ; पहा आता किती मिळेल रक्कम ?

हॅलो कृषी ऑनलाईन : वन्य प्राण्यांच्या हल्ल्यात पाळीव पशु किंवा मनुष्याची जीवितहानी झाल्यास, किंवा अपंगत्व अथवा जखमी झाल्यास शासनाकडून संबंधित पशुपालकाला किंवा जीवितहानी झालेल्या मनुष्याच्या कुटुंबियांना नुकसान भरपाई मिळते. वन्यप्राण्यांच्या हल्लाप्रकरणी आर्थिक परवड लक्षात घेऊन अर्थसाहाय्य आणि नुकसान भरपाईत नुकतीच शासनाने वाढ केली आहे. यासंबंधी नव्या निर्णयाची माहिती पत्रकाद्वारे पशुसंवर्धन विभागामार्फ़त देण्यात आली आहे.

नव्या निर्णयानुसार मदतीची रक्कम

1) मनुष्यांकरिता

वन्यप्राण्यांच्या हल्ल्यात व्यक्तीचा मृत्यू झाल्यास – २० लाख
व्यक्ती कायमस्वरूपी अपंग झाल्यास – ५ लाख
व्यक्ती गंभीर जखमी झाल्यास – सव्वा लाख रुपये

2) पाळीव प्राणी

१)(गाय, म्हैस व बैल) मृत्यू झाल्यास बाजार भाव किमतीच्या ७५ टक्के किंवा ७० हजार यापैकी जी रक्कम कमी असेल ती रक्कम
२) मेंढी, बकरी व इतर पशुधनांचा मृत्यू झाल्यास बाजार भाव किमतीच्या ७५ टक्के किंवा १५ हजार यापैकी कमी असणारी रक्कम
३)गाय, म्हैस, बैल या जनावरांना कायम अपंगत्व आल्यास बाजार भाव किमतीच्या ५० टक्के किंवा १५ हजार देण्यात येतील.

कशी मिळेल रक्कम ?

पाळीव प्राण्यांवर होणाऱ्या हल्ल्यांसाठी देण्यात येणारी नुकसान भरपाईची रक्कमही शासनाने वाढवली आहे. वन्यप्राण्यांच्या हल्ल्यामुळे व्यक्ती मृत झाल्यास रुपये २० लाख पैकी २० लाख रुपये देय असलेल्या व्यक्तीला तत्काळ धनादेशाद्वारे व उर्वरित रक्कम दहा लाख त्यांच्या राष्ट्रीयकृत बँकेत असलेल्या दरमहा व्याज देणाऱ्या संयुक्त खात्यामध्ये ठेव रक्कम जमा करण्यात येईल. रुपये दहा लाखांपैकी रुपये पाच लाख पाच वर्षांकरिता ठेव रकमेमध्ये तर उर्वरित रुपये पाच लाख १० वर्षांकरिता फिक्स डिपॉझिटमध्ये ठेवण्यात येतील.

See also  न्यूज नालंदा – रजाई में लिपटी सड़क किनारे मिली महिला की लाश, जानें हत्या का तरीका …

दहा वर्षांनंतर वारसांना पूर्ण रक्कम मिळेल. तसेच व्यक्ती किरकोळ जखमी झाल्यास औषधोपचारासाठी येणारा खर्च देण्यात येईल. मात्र खासगी रुग्णालयात औषधोपचार करणे आवश्यक असल्यास रकमेची मर्यादा रुपये २० हजार प्रती व्यक्ती अशी आहे, असे सांगण्यात आले.

पशुधनासाठी नुकसान भरपाई

गाय, म्हैस व बैल यांचा वन्यप्राण्यांच्या हल्ल्यात मृत्यू झाल्यास बाजार भाव किमतीच्या ७५ टक्के किंवा ७० हजार यापैकी जी रक्कम कमी असेल ती रक्कम देय होईल. मेंढी, बकरी व इतर पशुधनांचा मृत्यू झाल्यास बाजार भाव किमतीच्या ७५ टक्के किंवा १५ हजार यापैकी कमी असणारी रक्कम मिळेल. गाय, म्हैस, बैल या जनावरांना कायम अपंगत्व आल्यास बाजार भाव किमतीच्या ५० टक्के किंवा १५ हजार देण्यात येतील, असेही सांगण्यात आले.

Leave a Comment