दुधाच्या दरात वाढ ! दूध उत्पादकांना दिलासा तर ग्राहकांच्या खिशाला कात्री

हॅलो कृषी ऑनलाईन : ऐन सणासुदीच्या काळात पेट्रोल, डिझेल, भाजीपाल्यासहीत जवळपास सर्वच वस्तूंच्या किमतीमध्ये वाढ झाली आहे. असे असताना आता दुधाच्या किमतीत सुदधा ७ रुपयांची वाढ करण्यात येणार आहे. दुधाची ही दरवाढ मुंबई मध्ये होणार आहे. त्यामुळे मुबईकरांना आता सुट्या दुधासाठी ७ रुपये जादा मोजावे लागणार आहेत.

ही दूध दरवाढ येत्या एक सप्टेंबर पासून लागू होणार असून मुंबईत एक सप्टेंबर पासून सुटे दूध सात रुपयांनी महागणार आहे. त्यामुळे ग्राहकांना एक लिटर दुधासाठी 80 रुपये मोजावे लागणार आहेत. शिवाय हे नव्हे दर 28 फेब्रुवारी 2023 पर्यंत लागू असतील.

दरम्यान मुंबईसारख्या मोठ्या शहरांमध्ये राज्याच्या इतर भागातून विशेषतः ग्रामीण भागातून दुधाचा पुरवठा केला जातो. जनावरांचा चाऱ्याचा खर्च वाढला हरभऱ्यासारख्या चाराचे दर सुद्धा वाढले आहेत परिणामी याचा फटका आता दूध उत्पादकांना बसताना दिसतोय त्यामुळे दूध उत्पादकांनी सुट्ट्या दुधाच्या दरात वाढ करण्याचा निर्णय घेतला आहे. यामुळे एकीकडे दूध उत्पादकांना दिलासा मिळणार आहेत तर दुसरीकडे ग्राहकांच्या खिशाला मात्र कात्री लागणार आहे.

काही दिवसांपूर्वीच अमूल आणि मदर डेरी च्या दुधात प्रतिलिटर दोन रुपयांची वाढ करण्यात आली होती. गुजरात को-ऑपरेटिव मिल्क मार्केटिंग फेडरेशन अमूल्य दुधाच्या दरात चार टक्क्यांनी वाढ केली त्यामुळे 17 ऑगस्ट पासून अमूल दुधाच्या आणि मदर डेरी च्या दरात वाढ दोन रुपयांनी करण्यात आली आहे.

Comments

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *