हॅलो कृषी ऑनलाईन : राज्यात परतीच्या पावसामुळे ऐन काढणीला आलेल्या पिकांचे अतोनात नुकसान झाले आहे. परतीच्या पावसाचा सर्वाधिक फटका विदर्भ मराठवाड्याला बसला आहे. त्यामुळे शेतकऱ्यांच्या मधून ओला दुष्काळ जाहीर करण्याची मागणी प्रकर्षाने जोर धरू लागली आहे. औरंगाबादेत शेतकऱ्यांच्या प्रश्नावरून जनशक्ती शेतकरी संघटना आक्रमक झाल्याचे पाहायला मिळाले. शेतकऱ्यांना तातडीनं मदत करा या मागणीसाठी शेतकऱ्यांनी औरंगाबाद इथं पाण्याच्या टाकीवर चढून आंदोलन करण्यात आले आहे.
याबाबत मिळालेली अधिक माहिती अशी की, औरंगाबाद जिल्ह्यात शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाले आहे. मात्र शेतकऱ्यांच्याकडे पाहण्यास कोणीही तयार नाही. शिवाय जिल्ह्याला पालकमंत्री संदिपान भुमरे हे औरंगाबादचे आहेत, कृषीमंत्री अब्दुल सत्तार हे औरंगाबाद जिल्ह्यातील असूनही शेतकऱ्यांनी न्याया मिळत नाही. एवढे आमदार खासदार मंत्री असतानाही शेतकऱ्यांना न्याय मिळत नाही. शेतकऱ्यांच्या नुकसानीचे पंचनामे होते नाहीत, मदत मिळत नाही त्यामुळं शेतकरी संकटात आहे. लाखो रुपये खर्चून शेतकऱ्यांच्या हातात काहीच नसल्याची खंत जनशक्ती शेतकरी संघटनेच्या कार्यकर्त्यांनी व्यक्त करीत पाण्याच्या टाकीवर चढून शोले स्टाईल आंदोलन केले.
अद्याप नुकसानीचे पंचनामेही पूर्ण झाले नाहीत. दिवाळी जाऊनसुद्धा राज्य सरकारनं शेतकऱ्यांना काही मदत दिली नाही. त्यामुळंशेतकऱ्यांना सरकारनं तातडीनं मदत करावी अशी मागणी जनशक्ती शेतकरी संघटनेनं केली आहे. या मागणीसाठी औरंगाबाद येथील पाण्याच्या टाकीवर चढून जनशक्ती शेतकरी संघटनेच्या कार्यकर्त्यांनी आंदोलन केलं. पालकमंत्री आणि केंद्रीय मंत्र्यांच्या घराजवळ शोले स्टाईलनं हे आंदोलन करण्यात आलं. मदत न दिल्यास पाण्याच्या टाकीवरुन उड्या मारु असा इशारा देखील आंदोलकांनी दिला आहे.