हॅलो कृषी ऑनलाईन : धान्याच्या काढणीनंतर एकाच वेळी मोठ्या प्रमाणात शेतकऱ्यांनी शेतमाल बाजारात विक्रीसाठी आणल्यामुळे शेतमालास योग्य भाव मिळत नाही. गोदाम व धान्य साठवणुकीच्या अपुऱ्या सुविधा व शेतकऱ्यांच्या रोजच्या गरजा भागविण्यासाठी एकाच वेळी शेतमाल मोठ्या प्रमाणात बाजारात येत असतो. त्यामुळे शेतमालाच्या बाजारभावात मोठ्या प्रमाणात घसरण होत असते.
हा शेतमाल साठवणूक करुन काही कालावधीनंतर बाजारपेठेत विक्रीसाठी आणल्यास त्या शेतमालास जादा बाजार भाव मिळू शकतो. तेव्हा शेतकऱ्यांना त्याच्या शेतमालासाठी योग्य भाव मिळावा या दृष्टीकोनातून कृषि पणन मंडळ सन १९९०-९१ पासून शेतमाल तारण कर्ज योजना राबवित आहे.
शेतमालाच्या काढणे हंगामात उतरत्या भावामुळे होणारे आर्थिक नुकसान टाळून राज्यातील शेतकऱ्यांना सुलभ कर्ज उपलब्ध करून देण्यासाठी महाराष्ट्र राज्य कृषी पणन मंडळ राज्यातील बाजार समित्यांच्या माध्यमातून शेतमाल तारण कर्ज योजना राबवत आहे
योजनेचे स्वरूप
१) काढणी हंगामात शेतकऱ्यास आलेली आर्थिक निकड विचारात घेऊन या गरजेच्या वेळी आर्थिक सहाय्य उपलब्ध करून देणे.
या योजनेमध्ये तूर मूग उडीद सोयाबीन सूर्यफूल हरभरा भात करडई ज्वारी बाजरी गहू मका बेदाणे काजू बी हळद सुपारी व वाघ्या घेवडा(राजमा) या शेतमालाचा समावेश आहे.
२)शेतकऱ्यांना बाजार समितीच्या गोदामा तारण ठेवलेल्या शेतमालाच्या एकूण किमतीच्या 75 टक्के पर्यंत सहा टक्के व्याजदरांना सहा महिने कालावधीसाठी कर्ज त्वरित उपलब्ध होते.
३) बाजार समितीच्या गोदामात ठेवलेल्या शेतकऱ्यांचे शेतमालासाठी गोदाम भाडे विमा देखरेख खर्च अधिक खर्चाची जबाबदारी बाजार समितीवर असल्याने शेतकऱ्यांना भुरदंड बसत नाही.
४)सहा महिन्याच्या आत कर्ज परतफेड करणाऱ्या बाजार समित्यांना तीन टक्के व्याज सवलत मिळते
५) स्वनिधीतून तारण कर्ज राबवणाऱ्या बाजार समित्यांनी वाटप केलेल्या तारण कर्ज रकमेवर तीन टक्के व्याज सवलत तसेच अनुदान स्वरूपात मिळते.
६) योजना राबवण्यासाठी सुवनिधी नसलेल्या बाजार समित्यांना पण मंडळाकडून पाच लाख अग्रीम उपलब्ध होतात.
७) केंद्रीय राज्य वखार महामंडळाच्या गोदामातील शेतकऱ्यांच्या मालाच्या वखार पावतीवर तारण कर्ज उपलब्ध होते
कुठे कराल संपर्क
या योजनेचा लाभ घेण्यासाठी जवळच्या कृषी उत्पन्न बाजार समिती तसेच कृषी पणन मंडळाची विभागीय कार्यालय येरवडा पुणे 6 येथे प्रत्यक्ष भेट द्या
dsopune6@gmail.com या संकेतस्थळाला भेट द्या.