Land Measurement : शेतकरी बांधवांसाठी खुशखबर! आता ऑनलाईन पद्धतीने होणार जमीनीची मोजणी, फक्त ‘हे’ अँप करा डाऊनलोड

Land Measurement : आपला भारत देश हा कृषिप्रधान देश आहे. अनेक कुटुंबाचा उदरनिर्वाह केवळ शेतीवर होतो. काही शेतकरी शेतीवर अवलंबून न राहता त्याच्यासोबत पशुपालनासारखा जोडव्यवसाय करतात. परंतु बऱ्याच वेळा शेतकऱ्यांना आपल्या सातबाऱ्यावर जेवढी शेतजमीन नमूद केली असते, तेवढी जमीन त्यांना प्रत्यक्षात दिसत नाही. त्यामुळे ते शासकीय पद्धतीनं मोजणी करतात. पण सरकारी काम जरा वेळ थांब या उक्तीप्रमाणे या सर्व बाबींमध्ये खूप वेळ जातो.

पण आता शेतकऱ्यांसाठी ऑनलाईन जमीन मोजणी प्रक्रिया सुरु झाली आहे. तुम्ही दोन मिनिटांत तुमची जमीन घरी बसूनही अगदी अचूक मोजू शकता. यासाठी तुम्हाला तुमच्या मोबाईलवर गुगल प्ले स्टोअरला जाऊन Hello Krushi नावाचे अँप डाउनलोड करून घ्यावे लागेल. यामध्ये जमीन मोजणी ऑनलाईन करण्याची सुविधा आहे. यासोबतच सातबारा उतारा डाउनलोड करणे, रोजचे बाजारभाव मिळवणे, तुमच्या गावातील हवामान अंदाज जाणून घेणे अशा अनेक बाबीचा लाभ घेता येतो.

सर्वात महत्त्वाचे म्हणजे जमीन मोजणीचे एकूण तीन प्रकार पडतात. यामध्ये साधी मोजणी 6 महिन्यांच्या कालावधीत करण्यात येते. तर तातडीची मोजणी 3 महिन्यांत आणि अतितातडीची मोजणी 2 महिन्यांच्या आत करण्यात येते. जर तुम्हाला एक हेक्टर क्षेत्रावर साधी मोजणी करायची असेल तर 1 हजार रुपये, तातडीच्या मोजणीसाठी 2 हजार रुपये, तर अतितातडीच्या मोजणीसाठी 3 हजार रुपये शुल्क भरावे लागते. (Land Measurement)

यासाठी शेतकऱ्यांना भूमी अभिलेख कार्यालयात सतत जावे लागते. परंतु आता शेतकऱ्यांना हा त्रास सहन करावा लागणार नाही. कारण १ ऑगस्टपासून शेतजमीनीच्या मोजणीचे कामकाज ऑनलाईन पद्धतीने होणार आहे, अशी महत्त्वाची माहिती भूमी अभिलेख विभागाचे उपअधीक्षक योगेश थोरात यांनी दिली आहे. त्यामुळे शेतकऱ्यांना काहीसा दिलासा मिळाला आहे.

शेतकऱ्यांनो यासोबत एक महत्वाची गोष्ट म्हणजे तुम्ही जर Hello krushi हे अँप प्ले स्टोअरला जाऊन इंस्टाल केले तर तुम्हाला यामध्ये अगदी मोफत जमीन मोजणी करता येईल. त्यामुळे तुम्हाला जर तुमच्या शेतजमिनीची मोजणी अचूक पद्धतीने करायची असेल तर लगेचच प्ले स्टोअरवर जाऊन Hello Krushi हे अँप इंस्टाल करा.

शेतकऱ्यांना आपल्या शेतजमिनीची मोजणी करण्यासाठी कार्यालयात न जाता ऑनलाईन पद्धतीने अर्ज दाखल करावा लागणार आहे. ऑनलाईन अर्ज दाखल केल्यानंतर शेतकऱ्यांना लगेचच त्यांच्या मोबाईलवर शेतीची मोजणीची तारीख संदेशाद्वारे समजेल. सर्वात महत्त्वाचे म्हणजे पुढच्या १५ दिवसाच्या आत जमिनींची मोजणी पूर्ण होऊन संबंधित शेतकऱ्यांना शेतजमिनीचा अचूक नकाशा ऑनलाईनच डाऊनलोड करता येईल.

उपग्रहाद्वारे मोजणी करून मोजणी नकाशामध्ये क्यूआर कोडच्या साहाय्याने अक्षांश आणि रेखांश उपलब्ध करून देण्यात येणार आहेत. मोजणीसाठी खासगी कंपनीची मदत घेऊन कमीत कमी वेळेत अचूक मोजणी करण्यावर भर देण्यात येत आहे. सरकारच्या या निर्णयामुळे शेतकऱ्यांचा मोजणीसाठी लागणारा वेळ आणि त्रास कमी होणार आहे.

See also  बिहार में महागठबंधन की सरकार, एनडीए मंत्रियों के आवास पर बोर्ड बदले…अब पूर्व मंत्री के लगाए जा रहे बोर्ड

Leave a Comment