विरोधी पक्षनेते आंबादास दानवेंचा बीड दौरा; आत्महत्याग्रस्त शेतकरी कुटुंबाची घेतली भेट

हॅलो कृषी ऑनलाईन : विरोधी पक्षनेते आंबादास दानवे आज बीड जिल्ह्याच्या दौऱ्यावर आहेत. आत्महत्याग्रस्त शेतकरी कुटुंबाची ते भेट घेत आहेत. आज बीड शहराजवळच्या सामनापूर येथे आत्महत्या केलेल्या शेतकऱ्याच्या कुटुंबीयांची भेट घेतली. त्या कुटुंबाचे सांत्वन केले यावेळी दानवे यांच्यासमोर आपल्या व्यथा मांडताना एका तरुण शेतकऱ्याला अश्रू अनावर झाले होते. यावेळी बोलतांना तरुण म्हणाला की, अशा आर्थिक परिस्थितीत नोकरी नाही,कुठे काम मिळत नाही. यामुळे ग्रामीण भागातील तरुण प्रचंड नैराश्यात गेले आहेत. भविष्यात आपलं काय होणार आहे हे कुणालाच काहीच कळत नाही, असे सांगताना तो ढसाढसा रडायला लागला.

यावेळी बोलताना आंबादास दानवे म्हणाले की, राज्यात दिवसाला दररोज सरासरी 3 शेतकरी आत्महत्या करतायत. या खोके सरकारच्या शेतकरी विरोधी धोरणामुळे राज्यात गेल्या दोन महिन्यात जवळपास 200 शेतकऱ्यांनी आत्महत्या केल्या आहेत. दरम्यान आज बीड जिल्हातील समनापुर येथील नवनाथ शेळके या आत्महत्याग्रस्त शेकऱ्याच्या घरी सांत्वनपर भेट देत कुटुंबियांशी संवाद साधत प्रशासनाला लवकरात लवकर मदत देण्याचे सुचना केल्या आहेत. दिड लाख रुपयांचे कर्ज व्याजासह साडेपाच लाखांवर जाऊन पोहचले. कर्ज कसे फिटणार याची चिंता उराशी घेऊन या शेतकऱ्याने मुत्यू जवळ केला, असल्याचं दानवे म्हणाले.

अतिवृष्टीनंतर शेतकऱ्यांना मदत मिळाली नाहीं. फक्त घोषणाचा पाऊस होतोय. अतिवृष्टी, बॅंकांची थकबाकी, यंदाची खरीप व दुबार पेरणीसाठी खाजगी सावकारांकडून 15-20 टक्क्यांनी कर्ज काढावे लागत आहे. त्यामुळे खोके सरकारला हात जोडून विनंती आहे की, दिल्लीश्वरांच्या समोर लोटांगन तसेच तुमच्या सोबत आलेल्या आमदारांची नाराजी नाट्य दुर झाले असेल तर शेतकऱ्यांच्या प्रश्नाकडेही लक्ष द्यावे, अशी टीका दानवे यांनी शिंदे सरकारवर केली.

See also  पटना नगर निगम के कर्मचारी संघो ने कई दिनों से चल रहे हड़ताल को समाप्त करने का निर्णय लिया

Leave a Comment