जाणून घ्या ‘लंपी’च्या प्रसाराबद्दल महत्वाची माहिती

हॅलो कृषी ऑनलाईन : शेतकरी आणि पशुपालक मित्रांनो राज्यातील जवळपास ३० जिल्ह्यांमध्ये लंपी या रोगाचा प्रादुर्भाव झाला आहे. त्यामुळे सध्या पशुपालकांमध्ये भीतीचे वातावरण आहे. या रोगाच्या प्रसारासाठी कीटक हे मुख्य कारणीभूत आहेत. त्यामुळे या रोगाचा प्रसार रोखण्यासाठी काही महत्वाच्या बाबी लक्षात घेणे गरजेचे आहे. पशुधन व्यवस्थापनाबाबतची ही माहिती वसंतराव नाईक मराठवाडा कृषि विद्यापीठ, परभणी येथील ग्रामीण कृषि मौसम सेवा योजनेतील तज्ञ समिती यांच्यामार्फत देण्यात आली आहे.

–गोवंशीय पशुधनामध्ये सध्या लम्पी स्कीन डीसीज होत आहे. यांचा प्रसार अनेक मार्गापैकी एक म्हणजे किटकवर्गीय चावणाऱ्या माशांमार्फत होतो. त्या किटकवर्गीय माशा व त्यांचे नियंत्रण कशा पद्धतीने करता येईल ? जाणून घेऊया

किटकवर्गीय माशा : यामध्ये सर्वात जास्त हिमॅटोबीया प्रजातीची माशी, त्यानंतर टॅबॅनस, स्टोमोक्षीस, क्यूलिफॉईडस आणि डास, या सर्व प्रजातीच्या माशा रक्त शोषण करतात व लम्पी स्कीन डिसीजचे विषाणू यांत्रीक पध्दतीने प्रसारीत करतात.

1)हिमॅटोबीया : ही माशी पशुधनास अठ्ठेचाळीस वेळेस चावे व टाकलेल्या ताज्या शेणावरती अंडी घालते.

अ) शेणाची योग्य विल्हेवाट लावणे व शेणाचा खड्डा पॉलीथीन/ताडपत्रीने आच्छादित करणे.
ब) पशुधनाच्या शरीरावर वनस्पतीजन्य अथवा रासायनिक किटकनाशकाच्या द्रावणाची फवारणी करणे.

2)टॅबॅनस : ही माशी आकाराने मोठी असून गाय/म्हैस यांना प्रखर सुर्यप्रकाशामध्ये चावा घेते व त्याजागी रक्त वाहते.

अ) पशुधनास प्रखर सुर्यप्रकाशामध्ये (सकाळी 10 ते सायं. 5 पर्यंत) चरावयास सोडू नये व गोठयात ठेवावे.

3)स्टोमोक्सीस : या प्रजातीच्या माशा मुत्राने माखलेल्या वैरणीवरती आपली अंडी घालतात.

अ) गोठयातील अर्वरीत वैरण शेणाच्या खड्डयामध्ये टाकावी.
ब) या माशा देखील प्रखर सुर्यप्रकाश असताना चावतात म्हणून प्रखर सुर्यप्रकाशाच्या वेळा सोडून पशुधनास चरावयास सोडावे.

 

Comments

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *