हॅलो कृषी ऑनलाईन : राज्यात लंपी या चर्मरोगाचा वाढता प्रादुर्भाव पाहता त्यावर तातडीने नियंत्रण आणण्यासाठी राज्य शासनाकडून उपाययोजना करण्यात येत आहेत. राज्यातील शेतकरी पशुपालकांना लंबी रोगाविषयी संपर्क साधण्यासाठी मंत्रालयात समन्वय पक्षाची स्थापना करण्यात आली आहे. (02 2 – 28 45 13 2) या दूरध्वनी क्रमांकावर पशुपालकांनी संपर्क साधावा असावाहन पशुसंवर्धन विभागाचे प्रधान सचिव जे पी गुप्ता यांनी केला आहे.
राज्यात लंपी चर्म रोगावर नियंत्रण आणण्यासाठी लसीकरण करणे, बाधित पशुधनावर औषधोपचार करणे, पशुपालकांना आवश्यक ते मार्गदर्शन करणे इत्यादी कार्यवाही युद्ध पातळीवर सुरू आहे. तथापि काही ठिकाणी पशुपालकांना येणाऱ्या समस्यांचे निराकरण करून त्यांना योग्य मार्गदर्शन करणे तसेच शेतकरी पशु पालकांना संपर्क साधता यावा व क्षेत्रीय कार्यालयाशी समन्वय साधता यावा यासाठी मंत्रालयात रूम नंबर 520 पाचवा मजला (विस्तार) येथे समन्वय कक्ष सुरू करण्यात आला आहे.
राज्यातील चर्म रोगाचा वेळोवेळी आढावा घेणे, या रोगाचा प्रादुर्भाव नियंत्रणात आणण्यासाठी क्षेत्रीय यंत्रणेला मार्गदर्शन करणे, उपाययोजनांबाबत राज्य शासनाला शिफारस करणे, इत्यादींसाठी पशुसंवर्धन आयुक्तांच्या अध्यक्षतेखाली राज्यस्तरीय कार्यालयाचे गठन करण्यात आले आहे. यामध्ये तज्ञ व्यक्ती आणि शास्त्रज्ञांचा समावेश देखील करण्यात आला आहे.