सातारा जिल्ह्यात लंपीचा उद्रेक 11 पैकी 10 तालुक्यात शिरकाव

हॅलो कृषी ऑनलाईन : सकलेन मुलाणी सातारा

राज्यात लंपी या रोगाचा फैलाव मोठ्या प्रमाणात होत आहे. सातारा जिल्ह्यातील जनावरांना लंपी त्वचा रोगाचा उद्रेक वाढू लागला आहे. जिल्ह्यातील 11 तालुक्यांपैकी 10 तालुक्यात या रोगाचा शिरकाव मोठ्या प्रमाणात झाला आहे.

जिल्ह्यात शुक्रवारी एका दिवसात 5 जनावरांचा लंपी आजाराने मृत्यू झाला आहे. लंपी रोगाने जिल्ह्यातील 10 तालुक्यातील 71 गावे बाधित झाली आहेत. आत्तापर्यंत 573 जनावरांना लंपीची लागण झाली आहे, तर 82 जनावरे उपचाराने बरी झाली आहेत. 449 जनावरांवर सध्या उपचार करण्यात येत आहे.

जिल्ह्यातील 3 लाख 52 हजार जनावरांना पशुसंवर्धन विभागामार्फत लसीकरण करण्यात येणार आहे. त्यापैकी 1 लाख 43 हजार 63 जनावरांना लसीकरण करण्यात आले आहे.. पशुसंवर्धन विभागाकडे 2 लाख 81 हजार 900 लसमात्रा उपलब्ध असल्याची माहिती पशुसंवर्धन उपायुक्त डॉक्टर अंकुश परिहार आणि जिल्हा पशुसंवर्धन अधिकारी डॉक्टर संजय शिंदे यांनी दिली आहे.

लम्पीची लक्षणे आणि बचाव

१) लक्षणे

१)या आजाराचा संसर्ग झाल्यास प्रथम जनावरांच्या डोळयातून आणि नाकातून पाणी येते.
२)लसिकाग्रंथीना सूज येते.
३)सुरुवातीला जनावरांना ताप येतो.
४)दुधाचे प्रमाण कमी होते.
५)चारा खाणे, पाणी पिणे कमी होते.
६)हळूहळू डोके, मान, मायांग, कास इत्यादी भागाच्या त्वचेवर 10 ते 50 मिमी व्यासाच्या गाठी येतात.
७)तोंडातील व्रणामुळे आजारी जनावरांना चारा खाण्यास त्रास होतो.
८)डोळ्यातील व्रणामुळे चिपडे येतात, तसेच डोळ्यांची दृष्टी बाधित होते.
९)पायावर सूज येवून काही जनावरे लंगडतात.

काय घ्यावी काळजी ?

लम्पी त्वचा रोग हा संसर्गजन्य रोग असल्याने उपचार करण्यापेक्षा रोग येऊच नये याकरिता प्रतिबंधात्मक उपाययोजना व रोग आल्यास त्याचा प्रसार होऊ नये याकरिता पशुपालकांनी आवश्यक ती काळजी घेण्याची आवश्यकता आहे.

See also  जी डी गोयनका पब्लिक स्कूल पूर्णियां में बाल दिवस का आयोजन |

१)बाह्य किटकांवर नियंत्रण ठेवण्यासाठी गोठ्यांची व्यवस्थित स्वच्छता राखावी.
२)निरोगी जनावरांना बाधित जनावरांपासून वेगळे बांधावे.
३)गायी व म्हशींना एकत्रित ठेवण्यात येवू नये.
४)रोग सदृश लक्षणे आढळल्यास जवळच्या पशुवैद्यकीय संस्था प्रमुखांना तातडीने संपर्क साधावा.
५)बाधित जनावरांच्या पिण्याच्या पाण्याकरिता व तसेच चराईकरिता स्वतंत्र व्यवस्था करावी.
६)गोठ्यात त्रयस्थांच्या भेटी टाळाव्यात.
७)बाधित परिसरात स्वच्छता करावी व निर्जंतुक द्रावणाची परिसरात फवारणी करावी.
८)फवारणीसाठी 1 टक्के फॉर्मलीन किंवा 2 ते 3 टक्के सोडियम हायपोक्लोराईट, फिनॉल 2 टक्के यांचा वापर करावा
९)या रोगाने ग्रस्त जनावरांचा मृत्यू झाल्यास मृतदेहाची शास्त्रीय पद्धतीने कमीत कमी ८ फूट खोल खड्डयात गाडून विल्हेवाट लावावी.
१०)मृत जनावरांच्या खाली व वर चुन्याची पावडर टाकण्यात यावी.

Leave a Comment