‘माझा एक दिवस माझ्या बळीराजासाठी’ उपक्रमाला मेळघाटातून सुरुवात ; कृषिमंत्र्यांचा शेतकऱ्याच्या घरी मुक्काम

हॅलो कृषी ऑनलाईन : राज्याचे कृषी मंत्री अब्दुल सत्तार यांनी घोषणा केलेल्या ‘माझा एक दिवस माझ्या बळीराजासाठी’ या उपक्रमाची सूरूवात करण्यात आली आहे. या उपक्रमाची सुरुवात अमरावती येथील साद्राबाडी या गावापासून करण्यात आली आहे. काल पासूनच कृषिमंत्री आणि अधिकारी या गावात दाखल झाले.

काल रात्रीच्या वेळी साद्राबाडी गावातील शेतकरी शैलेंद्र सालकर यांच्याकडे कृषी मंत्री अब्दुल सत्तार मुक्कामी राहिले होते. कृषिमंत्री गावात पोहचल्यानंतरण या उपक्रमाचे गावकऱ्यांकडून स्वागत करण्यात आले. आज मेळघाटातील साद्राबाडी या गावातून ‘माझा एक दिवस माझ्या बळीराजासाठी’ या उपक्रमाचा शुभारंभ करणार आहेत. आज दिवसभर सत्तार हे प्रत्यक्ष शेतात जाऊन शेतकऱ्यांशी चर्चा करणार आहेत. शेतकऱ्यांच्या अडचणी जाणून घेण्यासाठी पदाधिकारी, अधिकारी हे संपूर्ण एक दिवस शेतकऱ्यांसोबत राहून संवाद साधणार आहेत. तसेच प्रत्येकांच्या अडचणी समजून घेणार आहेत.

योजना शेतकऱ्यांपर्यंत पोहचत नाहीत

यावेळी माध्यमांशी बोलताना त्यांनी सांगितले की , मी इथे आल्यापासून शेतकऱ्यांची दिनचर्या, त्यांची दैनंदिनी, त्यांच्या अडचणी समजून घेण्याच्या प्रयत्न करीत आहे. इथे आल्यानंतर लक्षात आले की, सरकारी योजना शेतकऱ्यांपर्यंत पोचतच नाही. अनेक योजनांचा लाभ अद्यापही शेतकऱ्यांपर्यंत पोहचत नाहीत. आज दिवसभर अधिकारी येतील त्यांच्या अडचणी त्या अडचणींवर उपाय कसे काढता येईल हे पाहणार आहोत. १०० दिवसाच्या या कार्यक्रमाची घोषणा झाली आहे. आय ए एस आणि इतर अधिकारी राज्यातल्या शेतकऱ्यांच्याकडे जातील. पूर्ण डेटा जमा करतील शेतकऱ्यांच्या एक दिवसाच्या उत्पन्न आणि खर्चाचा लेखाजोगा मंडला जाईल. शेतकऱ्यांच्या अडचणींवर उपाय काढला जाईल असे सत्तार म्हणाले.

असा असेल आजचा कार्यक्रम

कृषीमंत्री सत्तार हे आज सकाळी दत्तात्रय पटेल यांच्यासोबत शेतात जातील. तिथे सोयाबीन फवारणी होईल आणि त्यांच्याशी चर्चा करतील. त्यांनतर बाजूलाच असलेल्या राजेश डावलकर यांच्या शेतात कापूस डवरणी/फवारणी होईल. नंतर बाबूलाल जावरकर यांच्या शेतात विद्युत पंप दिले त्याची पाहणी आणि सोयाबीन फवारणी होईल. तिथून ते किशोरीलाल धांडे यांच्या शेतात जाऊन त्यांच्या शेतात असलेल्या संत्रा बागेची पाहणी आणि संत्र्याची छाटणी, खत देणे, फवारणी होऊ शकते. त्यांनतर नंदलाल बेठेकर यांना विहीर दिली त्याची पाहणी करतील. तिथून अशोक पटेल यांच्या शेतात ठिंबक संच पाहणी करणार आणि रामगोपाल भिलावेकर यांच्या शेतात तुषार संच पाहणी. आणि मग बाटु धांडे यांच्या शेतात रोटावेटरची पाहणी आणि नथु गाडगे यांच्या शेतात अतिवृष्टीमुळे झालेल्या नुकसानाची ते पाहणी करतील आणि मग पुरुष बचत गट यांची अवजार बँक पाहणी कृषीमंत्री अब्दुल सत्तार करणार आहेत.

See also  कटिहार में जम्मू कश्मीर ले जा रही 6 विदेशी लड़की सहित 2 दलाल गिरफ्तार

Leave a Comment