सोलापुरात सोन्या बैलाच्या पाठीवर झूल नाही तर उद्धव ठाकरेंसाठी खास संदेश…

हॅलो कृषी ऑनलाईन : मागच्या काही दिवसात महाराष्ट्राने मोठी राजकीय उलथापालथ अनुभवली आहे. उद्धव ठाकरे यांना महाराष्ट्राच्या मुख्यमंत्री पदावरून पायउतार व्हावे लागले. सध्या एकनाथ शिंदे मुख्यमंत्री आहेत. मात्र माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या कार्याची दखल केवळ राष्ट्रीय स्तरावर नाही शेतकऱ्यांच्या मनात अद्यापही असल्याचे दिसून आले. बैलपोळा सणानिमित्त माजीमुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यासाठी खास संदेश बैलाच्या पाठीवर लिहिण्यात आला होता. त्याची चर्चा आता होऊ लागली आहे.

सोलापुरातील बार्शी तालुक्यातील शेतकरी अविनाश कापसे यांच्या बैलाच्या पाठीवर झुल नाही तर लिहण्यात आलेला एक संदेश राज्य़भर व्हायरल होत आहे, ” मुख्यमंत्री म्हणून तुमचे योगदान विसरता येणार नाही, माझा बळीराजा कोरोना काळातही तुमच्यामुळे सुरक्षित राहिला आहे ” . अशा आशयाचा संदेश बैलाच्या पाठीवर लिहण्यात आलेला आहे. त्यामुळे जवळचे दुरावले तरी सोन्या बैलाची थाप असल्याची चर्चा आता रंगू लागली आहे.

सोन्या अन् शिल्याची जोडी

बैल पोळ्या दिवशी बैलजोडीने केलेल्या कामाच्या ऋणाईत हा सण साजरा केला जातो. शिवाय बैलावर साजश्रृंगार करुन ढोल-ताशाच्या गजरात त्यांची मिरवणूक काढली जाते. मात्र, जिल्ह्यातील बार्शी तालुक्यातील सोन्या अन् शिल्याची बैलजोडी ही वेगळ्याच बाबीने चर्चेत आली आहे. यामधील सोन्याच्या पाठीवरील जो संदेश आहे तो सध्या मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे. सध्याचे राजकारण काही का असेना पण कोरोना काळात उद्धव ठाकरे यांनी केलेले कार्य न विसरता येण्यासारखे आहे असाच संदेश पोळ्याच्या दिवशी देण्यात आल आहे.

 

See also  लातूरसह राज्यातल्या अनेक भागात मुसळधार पाऊस; शेताला तळ्याचे स्वरूप

Leave a Comment