कांद्याचे भाव वाढण्याची शक्यता; कांदा उत्पादकांना मिळणार का दिलासा ?

हॅलो कृषी ऑनलाईन : महाराष्ट्रात नाफेडने जुलै महिन्यातच कांद्याची खरेदी पूर्ण केली होती. राज्यात सर्वाधिक खरेदी नाशिक जिल्ह्यातून झाली होती.तर आता नाफेडच्या माध्यमातून खरेदी केलेला कांदा साठवणुकीत सडल्याची माहिती आहे. यावर्षी नाफेडने 2 लाख 38 हजार टन कांद्याची खरेदी केली होती.हा कांदा अद्याप बाजारात विक्रीसाठी आणलेला नाही. खरेदी केलेला आणि बफर स्टॉकमध्ये साठवलेला कांदा ऑगस्ट ते डिसेंबर दरम्यान सरकारी संस्थांमार्फत राज्ये आणि केंद्रशासित प्रदेशांच्या किरकोळ विक्रेत्यांना पुरवला जाईल, अशी घोषणा करण्यात आली. परंतु, आता साठवलेला कांदा जवळपास सडला आहे.याशिवाय शेतकऱ्यांनी साठवलेला कांदाही मोठ्या प्रमाणात सडत आहे.

50% कांदे कुजल्यामुळे खराब 

केंद्र सरकारने नाफेडमार्फत किंमत स्थिरीकरण योजनेंतर्गत या वर्षासाठी 2 लाख 38 हजार टन कांद्याची खरेदी केली आहे. नाफेडने 13 जुलैपर्यंत हा कांदा खरेदी केला होता. हा कांदा फेडरेशन ऑफ फार्मर प्रोड्युसर कंपनीच्या माध्यमातून खरेदी करण्यात आला. खरेदी केलेला कांदा साठवणुकीत ठेवला आहे. परंतु, आता वाढलेली आर्द्रता आणि वातावरणातील बदलामुळे कांदा सडत आहे. कांद्यामधून काळे पाणी निघत असून, सुमारे पन्नास टक्के कांदा खराब झाल्याची माहिती आहे.

कांद्याचे भाव वाढू शकतात

अशाप्रकारे कांद्याचे नुकसान होत असल्याने येत्या काही दिवसांत कांद्याचे भाव वाढण्याची शक्यता वर्तवली जात आहे. निसर्गाची अवकृपा, बदलते हवामान आणि मुसळधार पाऊस यामुळे यंदा परिस्थिती अधिकच बिकट होत आहे. यासोबतच नवीन खरीप कांद्याची लागवडही कमी होत आहे. , त्यामुळे पुढील हंगामात उत्पादनात घट होणार असून, त्यामुळे बाजारात कांद्याचे भाव वाढण्याची शक्यता आहे.

मुख्यमंत्र्यांनी केंद्राकडे केली होती मागणी

महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी केंद्रीय ग्राहक व्यवहार, अन्न व सार्वजनिक वितरण मंत्री पियुष गोयल यांना पत्र लिहून नाफेडमार्फत कांद्याची खरेदी करण्याची विनंती केली होती. नाफेडने यापूर्वीच २ लाख ३८ हजार टन कांदा खरेदी केला आहे. त्यात 2 लाख टनांनी वाढ करावी, अशी मागणी मुख्यमंत्र्यांकडे केली होती. मात्र, या पिकावर महाराष्ट्र कांदा उत्पादक संघटनेने नाराजी व्यक्त केली होती. संस्थापक अध्यक्ष भरत दिघोळे म्हणाले की, यंदा तरी नाफेडने कमी भावात कांदा खरेदी केला असून साठवलेला कांदा सडत आहे, त्यामुळे या निर्णयावर संघटना समाधानी नाही.

 

 

 

 

 

 

Comments

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *