Online Satbara Utara : 7/12 बाबत तुम्हाला या बाबी माहिती आहेत का? नुकसान टाळायचे असेल तर आजच जाणून घ्या महत्वाची माहिती

Online Satbara Utara : शेतकऱ्यांसाठी सातबारा उतारा अतिशय महत्वाचे कागदपत्र मानले जाते. सातबारा उताऱ्या शिवाय शेतकऱ्यांच्या कोणत्याच गोष्टी पूर्ण होत नाहीत. शेतकऱ्यांना एखाद्या सरकारी योजनेचा लाभ घ्यायचा असेल तरी सातबारा उतारा हा लागतोच. नुकताच सातबारा उतारा बाबत देखील सरकारने एक मोठा निर्णय घेतला आहे. आता तुम्ही तुमच्या मोबाईलवरून अगदी सहज सातबारा उतारा डाउनलोड करू शकता. यासाठी गुगल प्ले स्टोअरवरील Hello Krushi मोबाईल अँप आजच डाउनलोड करून घ्या.

आपल्याला प्रत्येक गोष्टीमध्ये सातबारा उतारा हा लागतोच. आता सातबारा वापरताना तुम्हाला देखील बऱ्याचदा असा प्रश्न पडला असेल की सातबारा लिखित स्वरूपात वापरावा का डिजिटल स्वरूपात वापरावा की अन्य कोणत्या स्वरूपात वापरावा असे अनेक प्रश्न तुम्हाला पडले असतील. सरकारी योजनांचा लाभ घेताना सातबारा कोणता वापरावा याबाबत काही नियम आहेत का? असाही प्रश्न तुम्हाला पडला असेल तर याबद्दल सर्व माहिती जाणून घेऊयात. 23 नोव्हेंबर 2020 पासून राज्य सरकारने सातबारा उतारा वापरण्याबाबत काही महत्त्वाचे आदेश दिले आहेत. आज आपण याच नियमांबद्दल माहिती पाहणार आहोत. त्यामुळे तुम्ही कोणता सातबारा वापरू शकता? कोणत्या सातबारावर निर्बंध आहेत? याची माहिती पाहणार आहोत.

शासकीय कामकाजास कोणता सातबारा उतारा वापरणे योग्य?

शेतकरी मित्रांनो तुम्हाला कोणत्याही शासकीय कामकाजासाठी सातबारा उतारा हवा असेल तर पूर्वी तलाठी कार्यालयातून स्वाक्षरीचा सातबारा घ्यावा लागत असे. मात्र हे काम खूप वेळखाऊ असल्याने कामात दिरंगाई होई. यावर उपाय म्हणून आता सरकारने डिजिटल स्वाक्षरीचा सातबारा ऑनलाईन डाउनलोड करण्याची सुविधा उपलब्ध केली आहे. गुगल प्ले स्टोअरवरील Hello Krushi नावाचे मोबाईल अँप डाउनलोड करून तुम्ही अगदी सहज हवा तेव्हा डिजिटल सातबारा, भूनकाशा, जमीन मोजणी आदी सेवांचा लाभ घेऊ शकता.

डिजिटल सातबारा, जमिनीचा नकाशा मोबाईल वरून डाऊनलोड करण्याची सर्वात सोपी पद्धत कोणती?

शेतकरी मित्रांनो पूर्वी सातबारा डिजिटल, सातबारा काढण्यासाठी तलाठी कार्यालयाकडे तुम्हाला हेलपाटे घालावे लागायचे मात्र आता महाराष्ट्रातील शेतकऱ्यांचा विचार करून आम्ही Hello Krushi या मोबाईल ॲपची निर्मिती केली आहे. यावरून तुम्ही तुमचा सातबारा, जमिनीचा नकाशा, डिजिटल सातबारा, आदी कागदपत्र डाऊनलोड करू शकता. त्याचबरोबर तुम्ही तुमची जमिनीची याच्या साहाय्याने मोजणी करू शकता. त्यामुळे हे ॲप शेतीसाठी अत्यंत उपयुक्त आहे. तुम्ही जर शेतकरी असाल तर लगेचच गुगल प्ले स्टोअर वर जाऊन हे ॲप इन्स्टॉल करा.

19 डिसेंबर 2020 चा पहिला शासन निर्णय याबाबत असा आहे की, भूलेख संकेतस्थळावरून आपले सरकार सेवा केंद्रमार्फत देण्यात येणाऱ्या विनाशुल्क संगणीकृत ७/१२ व ८/अ उताऱ्यांबाबत मार्गदर्शक सूचना दिल्या आहेत. याबाबत सविस्तर परिपत्रक पाहिले तर यामध्ये परिपत्रकामध्ये लिहिले आहे की, आपले सरकार सेवा केंद्रमार्फत देण्यात येणाऱ्या भूलिखित संकेतस्थळावरून जनतेला विनाशुल्क ७/१२ व ८/अ पाहण्याची सोय उपलब्ध करून देण्यात आली आहे.

सदर सुविधा आपले सरकार सेवा केंद्र चालक गैरवापर करीत असल्याचे महसूल व वन विभागाने माहिती तंत्रज्ञान विभागाच्या निदर्शनास आणले ७/१२ व ८/अ संबंधित महाभुमी तसेच छापाई केलेले त्यावर आपले सरकार सेवा केंद्र आणि सही शिक्क्यांशी संबंधित अभिलेखाच्या नकलांचा होणाऱ्या गैरप्रकाराबद्दल उपाययोजना करण्याच्या दृष्टिकोनातून शासन खालील प्रमाणे मार्गदर्शक सूचना निर्गमित करत आहेत.

1) महाभूमि संकेतस्थळावरून सातबारा उतारा ( ज्या सातबारा उतारा व आठ वर view only watermark असेल) ती माहिती फक्त माहितीसाठी असून त्याच्या प्रति कोणत्याही शासकीय अथवा कायदेशीर कामासाठी ग्राह्य मानण्यात येणार नाही.

2) आपले सरकार सेवा केंद्र तसेच महाभुमी संकेतस्थळावरील ७/१२ व ८/अ प्रतींवर सत्यतेची पडताळणी केल्याबाबत सही शिक्का करून वितरित करणार नाही. अशा प्रकारची बाब निदर्शनास आल्यास संबंधित तहसीलदार यांनी त्याबाबत चौकशी करून जिल्हाधिकारी यांच्याकडे तक्रार दाखल करावी व जिल्हाधिकाऱ्यांनी दोषीविरुद्ध योग्य कलमानुसार कारवाई करावी. तसेच या संबंधित प्राप्त झालेल्या तक्रारीवर जिल्हाधिकारी कार्यालय यांनी दर तीन महिन्यांनी माहिती तंत्रज्ञान संचालनालयाकडे कार्यालयाकडे अहवाल सादर करावा.

साधा सातबारा फक्त आपली माहिती पाहण्यासाठी

हा Online Satbara शेतकऱ्यांना फक्त आपली माहिती पाहण्यासाठी आहे. त्याचा वापर तुम्ही कुठल्याही शासकीय कामासाठी करू शकत नाही. यानंतर २३ नोव्हेंबर 2020 रोजी परत एक शासन निर्णय जारी करण्यात आला आहे. यामध्ये डिजिटल सातबारा उतारा हा सर्व कामांसाठी लागू करण्यात येणार येईल अशी मंजुरी देण्यात आली आहे. यामध्ये देखील काही महत्त्वाच्या बाबींचा विचार करून शासन परिपत्रक काढण्यात आलेले आहे.

बऱ्याच ठिकाणी अजूनही डिजिटल सातबारा निघत नाही. अशा लोकांसाठी तलाठी कार्यालयात जाऊन हस्तलिखित सातबारा वापरण्याबाबत मुभा देण्यात आली आहे. For view only सातबारा फक्त तुम्हाला तुमच्या जमिनीची माहिती किंवा तुमच्या सातबारातील नावे वगैरे पाहण्यासाठीच असणार आहे. याचा तुम्ही कोणत्याही कायदेशीर कामासाठी उपयोग करू शकत नाही. तुम्हाला कोणतीही सरकारी कामे करायचे असतील तर डिजिटल सातबारा काढावा लागतो.

सातबारा उतारा आता 24 भाषांमध्ये उपलब्ध

सातबारा उतारा आता भारतातील एकूण 24 भाषांमध्ये उपलब्ध होणार आहे. केंद्र सरकारच्या डिजिटल इंडिया लँड रेकॉर्ड ॲक्शन प्रोग्रॅम नुसार सातबारा उतारा प्रादेशिक भाषांसोबतच अन्य भाषांमध्ये देखील असावा असे सुचवण्यात आले होते. त्यानंतर आता देशामध्ये सर्वात प्रथम महाराष्ट्रात हा बदल करण्यात येणार आहे. यामुळे आता तुम्हाला तुमचा सातबारा अन्य भाषेतही मिळणे शक्य होणार आहे.

See also  बैन हुई ​डीजल कारें, पकड़े जाने पर कटेगा ₹20 हजार का चालान..

Leave a Comment