नंदूरबार जिल्ह्यात कापसावर लाल्या रोगाचा प्रादुर्भाव, शेतकरी चिंतेत

हॅलो कृषी ऑनलाईन : मागील वर्षी कापसाला मिळालेला चांगला भाव पाहता यावर्षी देखील राज्यात मोठ्या प्रमाणात कापसाची लागवड करण्यात आली आहे. मात्र यावर्षी देखील कापसावरील रोगराईचे संकट शेतऱ्यांच्या कष्टावर पाणी फिरवणार असे दिसते आहे. राज्यत कापसाचे चांगले उत्पादन घेणाऱ्या नंदुरबार जिल्यात कापसावर लाल्या रोगाचा प्रादुर्भाव झाला आहे. त्यामुळे कापूस उत्पादक शेतकरी अडचणीत सापडला आहे.

जळगाव, धुळे, नंदूरबार हे जिल्हे सर्वात मोठा कापूस उत्पादक शेतकऱ्यांचा पट्टा म्हणून ओळखले जातात. मोठ्या प्रमाणात या ठिकाणी कापसाचे उत्पादन घेतलं जाते. मात्र, नंदूरबार जिल्ह्यातील कापूस उत्पादक शेतकरी सध्या अडचणीत सापडला आहे. कारण कापूस पिकावर लाल्या रोगाचा प्रादुर्भाव होत आहे. यावर्षी खरीप हंगामात जिल्ह्यातील एक लाख 25 हजार हेक्टर क्षेत्रापेक्षा अधिक क्षेत्रावर कापसाची लागवड करण्यात आली आहे.

कापसाला मिळालेला चांगला भाव यावर्षी कायम असल्याचे चित्र दिसून येत आहे. मात्र, कापूस उत्पादक शेतकऱ्यांच्या अडचणीत वाढ होत आहे. नंदूरबार जिल्ह्यात मोठ्या प्रमाणात कापसावर लाल्या रोगाचा प्रादुर्भाव झाल्याचे दिसून येत आहे. लाल्या रोगाचा प्रादुर्भाव झाल्यानंतर कापसाची पाने लाल पडून गळत आहेत. पर्यायाने झाडाचे पोषण खुटत आहे.त्याचा परिणाम झाडाच्या वाढीवर आणि उत्पादनावर होत असतो. एकूण यावर्षी वेळेवर झालेला पाऊस आणि पोषक वातावरणामुळं कापसाचे उत्पादन चांगले येईल अशी अपेक्षा शेतकऱ्यांना होती. मात्र, लाल्या रोगाचा प्रादुर्भाव वाढल्यानं शेतकऱ्यांचा भ्रमनिरास झाला आहे.

नंदूरबार जिल्ह्यातील पंधरा ते वीस हजार हेक्टरपेक्षा अधिक क्षेत्रावर लाल्या रोगाचा प्रादुर्भाव दिसून येत असल्याची प्राथमिक माहिती उपलब्ध झाली आहे. राज्य सरकारनं लाल्या बाधित क्षेत्राचे पंचनामे करण्याचे आदेश द्यावेत. तसेच शेतकऱ्यांना सरसकट एकरी मदत जाहीर करावी अशी मागणी शेतकऱ्यांकडून केली जात आहे.

 

Comments

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *