हॅलो कृषी ऑनलाईन : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सोमवारी भारतीय कृषी संशोधन संस्थेच्या पुसा मेळा मैदानावर दोन दिवसीय पीएम किसान सन्मान संमेलन 2022 चे उद्घाटन केले आणि प्रधानमंत्री किसान सन्मान निधी (PM Kisan) योजनेअंतर्गत 16,000 कोटी रुपयांचा 12 वा हप्ता जारी केला. यावेळी मोदींनी अॅग्री स्टार्टअप कॉन्क्लेव्ह आणि प्रदर्शनाचे उद्घाटनही केले. याशिवाय, त्यांनी केंद्रीय रसायने आणि खते मंत्रालयांतर्गत 600 पीएम-किसान समृद्धी केंद्रांचे (PM -KSK) उद्घाटन केले आणि भारत यूरिया बॅग या ब्रँड नावाखाली शेतकऱ्यांसाठी वन नेशन-वन खत नावाची महत्त्वाची योजना सुरू केली.
यूरिया उत्पादन में आत्मनिर्भर के लिए भारत अब तेजी से लिक्विड नैनो यूरिया की तरफ बढ़ रहा है।
नैनो यूरिया, कम खर्च में अधिक प्रोडक्शन का माध्यम है।
जिसको एक बोरी यूरिया की जरूरत लगती है वो काम अब नैनो यूरिया की एक छोटी सी बॉटल से हो जाता है।
ये विज्ञान और टेक्नोलॉजी का कमाल है। pic.twitter.com/Cg6JqIUn2A
— BJP (@BJP4India) October 17, 2022
यावेळी पंतप्रधान मोदींनी करोडो शेतकरी, कृषी स्टार्टअप्स, संशोधक, धोरणकर्ते, बँकर्स आणि इतर भागधारकांना संबोधित केले. पीएम मोदी म्हणाले की, आज एक अशी संधी आहे की याच कॅम्पसमध्ये एकाच व्यासपीठावर स्टार्टअप्स आहेत आणि देशातील लाखो शेतकरी आहेत. आज या महत्त्वाच्या व्यासपीठावरून शेतकऱ्यांचे जीवन सुसह्य, शेतकरी अधिक समृद्ध आणि आपली कृषी व्यवस्था अधिक आधुनिक करण्याच्या दिशेने अनेक मोठी पावले उचलली जात आहेत. ते म्हणाले की, आज देशात 600 हून अधिक प्रधान मंत्री किसान समृद्धी केंद्रे सुरू होत आहेत.
एकसमान दर्जाचा युरिया विकला जाईल
पीएम मोदी म्हणाले की, ही अशी केंद्रे असतील जिथे केवळ खतच उपलब्ध होणार नाही, तर बियाणे, उपकरणे, माती परीक्षण, शेतकऱ्यांना आवश्यक असलेली कोणतीही माहिती या केंद्रांवर एकाच ठिकाणी उपलब्ध असेल. खत क्षेत्रामध्ये सुधारणा करण्याच्या आमच्या प्रयत्नांमध्ये आज आणखी दोन मोठ्या सुधारणा, मोठे बदल जोडले जाणार आहेत. पहिला बदल म्हणजे आजपासून देशभरातील 3.25 लाखांहून अधिक खतांची दुकाने प्रधानमंत्री किसान समृद्धी केंद्रे म्हणून विकसित करण्याची मोहीम सुरू केली जात आहे. वन नेशन, वन फर्टिलायझर मुळे शेतकऱ्याची सर्व प्रकारच्या संभ्रमावस्थेतून सुटका होणार आहे आणि चांगले खतही उपलब्ध होणार आहे. आता तेच नाव, तोच ब्रँड आणि त्याच दर्जाचा युरिया देशात विकला जाईल.
ते म्हणाले की, आज आपल्याकडे असलेल्या पारंपारिक भरड धान्य-बाजरीच्या बियाणांची गुणवत्ता वाढवण्यासाठी देशात अनेक हब तयार केले जात आहेत. भारताच्या भरडधान्याला जगभरातून प्रोत्साहन मिळावे यासाठी सरकारच्या प्रयत्नांनी पुढील वर्ष हे भरडधान्यांचे आंतरराष्ट्रीय वर्ष म्हणूनही घोषित करण्यात आले आहे. ‘पर ड्रॉप मोअर क्रॉप’ या मंत्राला अनुसरून सूक्ष्म सिंचनावर अधिक भर दिला जात आहे. गेल्या 7-8 वर्षात देशातील सुमारे 70 लाख हेक्टर जमीन सूक्ष्म सिंचनाच्या कक्षेत आणण्यात आली आहे.