हॅलो कृषी ऑनलाईन : राज्यात पावसाने उघडीप दिल्याने भात पट्ट्यात अनेक ठिकाणी भात कापणी वेगाने सुरू झाली आहे. भात कापणी करताना काय काळजी घ्यावी? याविषय़ी महात्मा फुले कृषी विद्यापीठाने दिलेली माहिती पाहुया. ज्याठिकाणी लागवड केलेली रोपे दाणे भरण्याच्या अवस्थेत आहेत तिथे १० सेंमी पाण्याची पातळी ठेवावी. भात कापणीपुर्वी १० दिवस आगोदर पाण्याचा निचरा करावा.
–भाताच्या हळव्या जाती पक्व झाल्या असल्यास काढणी करुन घ्यावी.
–भाताच्या लोंब्यामधील ८० ते ९० टक्के दाणे पक्व झाले असल्यास आणि रोपे हिरवट असतानाच वैभव विळ्याच्या सहाय्याने जमिनीलगत कापणी केल्यास वेळेत व खर्चात बचत होऊ शकते.
–कापलेला भात वाळण्यासाठी १ ते २ दिवस पसरुन ठेवावा व नंतर मळणी करावी. चांगला उतारा मिळण्यासाठी मळणीयंत्र वापरावे.
–दाण्यातील ओलाव्याचे प्रमाण १० ते १२ टक्के होईपर्यंत भात वाळवावा. नंतर कोरड्या, स्वच्छ व सुरक्षित जागी धान्याची साठवण करावी.
–कापणी उशीरा केल्यास लोंबीच्या टोकाचे भरलेले दाणे शेतात गळुन पडतात. भात कांडपाच्यावेळी कणीचे प्रमाण वाढते. पेंढयाची प्रत खालावते आणि पेंढा कमी मिळतो म्हणून भात पिकाची कापणी वेळेतच करावी.
Leave a Reply