प्रादुर्भाव झालेल्या पशुधनांसाठी विलगीकरण कक्ष उभारा : बच्चू कडू

हॅलो कृषी ऑनलाईन : राज्यभरात लंपी या त्वचा रोगाचा प्रादुर्भाव मोठ्या प्रमाणात पसरत आहे. एवढेच नाही तर यामुळे पशुधनाच्या जीवाला धोका निर्माण झाला असून पशुपालक चिंतेत आहेत. दरम्यान या आजाराच्या नियंत्रणासाठी विलगीकरण कक्ष तयार करून प्रादुर्भाव झालेल्या जनावरांना औषध उपचार करण्याकरिता तेथे एकत्रित ठेवण्याबाबतचे पत्र अचलपूर मतदारसंघाचे आमदार बच्चू कडू यांनी जिल्हाधिकाऱ्यांना दिले आहे.

राज्यामध्ये लम्पी स्कीन आजाराचा प्रसार वाढता असून त्यामध्ये पशुपालकांच्या घरी जाऊन पशुसंवर्धन विभागाचे अधिकारी, कर्मचारी औषधोपचार करीत आहेत. परंतु पशुसंवर्धन खात्यामध्ये मनुष्यबळ कमी असल्याने यात अपेक्षित यश मिळत नसल्याचे चित्र आहे. औषधोपचार न मिळाल्याने राज्यात जनावर दगावत आहेत.त्या पार्श्वभूमीवर छावणी योजनेच्या धर्तीवर विलगीकरण कक्षाची स्थापना करावी, अशा सूचना आमदार बच्चू कडू यांनी दिल्या आहेत. ज्या ठिकाणी पर्याप्त जागा उपलब्ध आहेत अशा ठिकाणी तयारी करून छावण्यांची उभारणी करावी.

येथे गोवंशीय पशू एकत्रित ठेवल्यास पशुवैद्यकीय अधिकाऱ्यांना आजारी जनावरांवर उपचार करणे व आवश्यकतेनुसार उत्तरीय तपासणीसाठी नमुना गोळा करणे, मृत पशूंची शास्त्रोक्त पद्धतीने विल्हेवाट लावणे, पशुपालकांनी पशूची काळजी घरीच घ्यावी.अत्यावश्यक औषधी शासन स्तरावर खरेदी करता येत नाही. परंतु पशूंना वाचवण्यासाठी अत्यावश्यक आहेत त्या औषधी आम्ही खरेदी करून पशुपालकांना उपलब्ध करून देत आहोत. आजारी पशूंचे विलगीकरण करणे ही बाब नवीन आहे.

तरीसुद्धा प्रायोगिक तत्त्वावर चांदूरबाजार, अचलपूर येथे हा प्रयोग करणार असल्याचे बच्चू कडू यांनी स्पष्ट केले. महाराष्ट्र राज्य राजपत्रित पशुवैद्यकीय संघटनेचे अध्यक्ष डॉ. रामदास गाडे यांनी देखील लम्पी स्कीचा प्रादुर्भाव असलेल्या भागात चारा छावण्यांच्या धर्तीवर विलगीकरण छावण्या उभारण्याची गरज व्यक्त केली आहे.

 

See also  Pulsar और Apache में से कौन-सी Bike है बेस्ट? खरीदने से पहले जान लीजिए ये जरूरी बातें..

Leave a Comment