ऊस उत्पादक शेतकऱ्यांसाठी दिलासादायक बातमी, यावर्षी गळीत हंगाम लवकर सुरु होणार

हॅलो कृषी ऑनलाईन : ऊस उत्पादक शेतकऱ्यांसाठी एक चांगली बातमी आहे. यंदाच्या वर्षी उसाचे गाळप १ ऑक्टोबर पासूनच सुरु करण्यात येणार आहे. याबाबतची माहिती सहकार मंत्री अतुल सावे यांनी दिली आहे. त्यामुळे ऊस उत्पादक शेतकऱ्यांना दिलासा मिळणार आहे.

याबाबत बोलताना अतुल सावे म्हणाले की, मागच्या वर्षी ऊस गाळप हंगाम संपल्यावर सुद्धा अनेक शेतकऱ्यांकडे ऊस शिल्लक होता. त्यामुळे यावर्षी अशी परिस्थिती उद्भवणारा नाही यासाठी लवकरच ऊस गाळप हंगाम सुरु करण्याचा आम्ही निर्णय घेतला आहे. त्यानुसार 15 सप्टेंबरला याबाबत एक बैठक घेऊन 1 ऑक्टोबरपासून गाळप सुरु करण्याचं ठरलं आहे. पंधरा दिवस अगोदरच गाळप सुरु केल्यास शेवटच्या टप्प्यात ऊस उरणार नाही असं सावे म्हणाले. सोबतच यामुळे शेतकऱ्यांचे नुकसान होणार आणि सरकारला सुद्धा नुकसानभरपाई देण्याची गरज पडणार नाही असेही सावे म्हणाले आहेत.

पुढे बोलताना ते म्हणाले, यावर्षी आम्ही एक नवीन मोबाईल ॲप तयार केला आहे. ज्यात शेतकऱ्यांना नोंदणी करता येणार आहे. यावेळी नोंदणी करतांना शेतकऱ्यांना त्यांच्या जवळच्या कारखान्याचा पर्याय उपलब्ध करून दिला जाईल. सोबतच दोन कारखान्यात नोंदणी करता येणार असून, ज्यात आपला ऊसाची क्वालिटी काय आहे, आपला ऊस कधी लागलेला आहे, त्यानुसार ॲपच्या माध्यमातून ऊस कारखान्यात पाठवता येणार, असल्याचं सावे म्हणाले.

 

 

Comments

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *