यंदाही पांढऱ्या सोन्याचा बोलबाला ! राज्यात कापसाला चांगला दर मिळण्याची शक्यता

हॅलो कृषी ऑनलाईन : शेतकरी मित्रांनो, मागील हंगामात इतर कोणत्याही शेतीमालापेक्षा कोणत्या मालाला चांगला भाव मिळाला तर तो कापसाला मिळाला. मागील हंगामात कापसाचा दर प्रति क्विंटल १४ हजारांपर्यंत पोहचला होता. त्यामुळे कापूस लागवडीतून चांगले उत्पन्न मिळण्याची आशा यंदाही वर्षी शेतकऱ्यांना लागून राहिली आहे. असे असताना एक आनंदाची बातमी म्हणजे नव्या कापसाला प्रति क्विंटल १० हजार रुपयांचा भाव मिळाला आहे.

महाराष्ट्रात कापसाला चांगला दर मिळण्याची आशा

यावर्षी हरियाणा राज्यातील पालवाल जिल्ह्यात या हंगामातील नवीन कापसाची आवक सुरु झाली आहे. इथे कापसाला 10 हजार रुपयांचा दर मिळाला आहे. हरियाणा आणि पंजाबच्या इतर भागात सप्टेंबरपासून नवीन कापसाची आवक वाढेल. यामुळे महाराष्ट्रातही या हंगामात कापसाला चांगला दर मिळण्याची शक्यता निर्माण झाली आहे. यावर्षी आंतरराष्ट्रीय बाजारात कापसाला असलेली मागणी, कापसाचा वाढलेला पेरा, संभाव्य उत्पादन आणि निसर्गाची साथ यामुळे कापसाला चांगला भाव मिळ शकतो.

उपलब्ध आकडेवारीनुसार देशात कापसाच्या लागवडीत 6.65 टक्क्यांनी वाढ झाली आहे. देशात नवीन कापूस साधारणपणे ऑक्टोबर महिन्यात मार्केटमध्ये येतो. यावेळी मात्र ऑगस्टमध्ये कापसाचे भाव आठ टक्क्यांनी वाढले आहेत. भविष्यात कापसाच्या भावात आणखी वाढ होण्याची शक्यता आहे. सध्या 500 गाठींपेक्षा कमी कापूस बाजारात दाखल झाला आहे. मात्र गेल्या वर्षीच्या तुलनेत या कापसाची किंमत जवळपास दुप्पट आहे. नवीन कापसाला 9 हजार 900 ते 10 हजार रुपये भाव मिळत आहे. गेल्या वर्षीच्या तुलनेत या कालावधीत कापसाचा सरासरी भाव 5 हजार रुपये होता. भविष्यात कापसाचा भाव 45 हजार ते 47 हजार रुपये प्रति गाठी असेल असं तज्ज्ञांचं मत आहे.

 

Comments

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *