Top 5 Wild Vegetables : औषधांपेक्षाही गुणकारी आहेत ‘या’ रानभाज्या, पावसाळ्यात जेवणात समाविष्ट कराल तर डॉक्टरांना कराल बायबाय

Top 5 Wild Vegetables : पावसाळा आला की सगळीकडे हिरवे पसरते त्यामुळे रोगराईचा देखील मोठ्या प्रमाणात प्रादुर्भाव होत. असतो यामुळे पावसाळ्यात शक्यतो हिरव्या पालेभाज्या खाऊ नका असा डॉक्टर कायम सल्ला देत असतात, मग हिरव्या पालेभाज्यांना पर्याय म्हणून आपण रानभाज्यांकडे वळतो. अनेक जणांना शेतातील रानभाज्यांची नावे देखील माहित नसतात त्यामुळे त्यांना या खाण्याचा लाभ देखील घेता येत नाही. मात्र आज आम्ही तुम्हाला काही अशा पाच रानभाज्या सांगणार आहोत ज्या खूप औषधी गुणधर्माने बनलेल्या आहेत. याचे सेवन केल्यानंतर तुमच्या आरोग्याला देखील याचा चांगला फायदा होणार आहे. त्यामुळे ही माहिती शेवटपर्यंत नक्की वाचा. (wild vegetables)

पहा कोणत्या आहेत या रानभाज्या (Top 5 Wild Vegetables)

१) कंटोळी

कंटोळी ही आयुर्वेदिक रानभाजी असून ती बहुतांश डोंगराळ भागामध्ये आढळते. ही भाजी कारल्यासारखी असते कारल्यापेक्षा थोड्या लहान आकाराची पाहायला मिळते. ही एक आयुर्वेदिक वनस्पती असल्यामुळे आपण जर त्याचे सेवन केले तर आपल्या शरीराला याचा मोठा फायदा होतो.

कंटोळी खाण्याचे नेमके फायदे काय जाणून घेऊयात

डोळे, हृदयासंबंधीत काही आजार त्याचबरोबर कॅन्सर इत्यादी रोगांवर प्रभावीपणे मात करण्यासाठी आपल्या शरीरामध्ये प्रतिकारक शक्ती ही रानभाजी तयार करते. त्याचबरोबर डोकेदुखी मधुमेह याचे देखील त्रास होत नाहीत. याचा सर्वात महत्त्वाचा फायदा म्हणजे याच्या सेवनाने तुमची वजन देखील कमी होऊ शकते.

२) टाकळा

टाकळा ही रानभाजी जास्तीत जास्त आपल्याला पावसाळ्यामध्ये पाहायला मिळते. त्याचबरोबर ही रानभाजी रस्त्याच्या कडेला, जंगलामध्ये, शेतामध्ये आपल्याला कुठेही सहजरित्या उपलब्ध होऊ होते. त्याचबरोबर पडीकी किंवा ओसाड जमिनीमध्ये देखील ही वनस्पती पाहायला मिळते

टाकळा खाण्याचे फायदे काय?

सर्व प्रकारच्या त्वचारोगांमध्ये ही वनस्पती अतिशय उपयुक्त मानली जाते. त्यामुळे तुम्ही या वनस्पतीचे जर सेवन केले तर त्वचे संबंधित तुमचे आजार दूर होतात. त्याचबरोबर ज्यावेळी लहान मुलांना पहिल्यांदा दात उगवतात त्यावेळी त्या मुलांना ताप येतो अशा वेळी जर आपण याचा काढा लहान मुलांना प्यायला दिला तर त्यामुळे लहान मुलांचा ताप कमी होतो. त्याचबरोबर पित्त, हृदयविकार, श्वास, खोकला आदी विकारांवर पानाचा रस मधातून द्यावा. आराम पडतो.

३) काटेमाठ

काटेमाठ ही वनस्पती देखील पावसाळ्याच्या दिवसांमध्ये येते. ओसाड जमीन किंवा रस्त्याच्या कडेला कुठेही आपल्यालाही वनस्पती पाहायला मिळते सप्टेंबर ते नोव्हेंबर यादरम्यान या वनस्पतीला फुले देखील येतात.

काटेमाठ वनस्पतीचे फायदे काय

बाळ झालेल्या स्त्रीने जर या भाजीचे सेवन केले तर बाळासाठी दूध वाढण्यास याची मदत होते. त्याचबरोबर गर्भपात होण्यास टळतो या वनस्पतीचे सेवन केल्यास पित्तावर देखील नियंत्रण मिळते आणि ही भाजी पचण्यासाठी हलकी असल्यामुळे पचनक्रिया व्यवस्थित होते.

४) आघाडा

आघाडा ही वनस्पती जंगलात तसेच शेतात आढळते या वनस्पतीचा औषधासाठी उपयोग केला जातो. एक औषधी वनस्पती म्हणून या वनस्पतीला ओळखले जाते. आघाडा वनस्पतीचे अनेक फायदे आहेत याच्यामुळे आपली हाडे मजबूत होतात. लघवी संबंधित कोणाला काही समस्या असतील तर आपली लघवी साफ होते. पचनशक्ती सुधारते त्याचबरोबर वात, हृदयरोग मूळव्याध या आजारांवर देखील गुणकारी आहे.

५) गुळवेल

गुळवेल ही वनस्पती झाडांवर किंवा कुंपणावर असते ही वनस्पती देखील खूप गुणकारी आहे. कोरोना काळामध्ये अनेक लोक गुळवेलाचा काढा करून पीत होते. यामुळे रोगप्रतिकारक शक्ती वाढत असल्याचे सांगितले जाते. त्याचबरोबर ही वनस्पती जास्तीत जास्त लिंबाच्या झाडावरती आढळून येते.

गुळवेल खाण्याचे फायदे

गुळवेल सर्दी, ताप, खोकला यावर गुणकारी आहे. त्याचबरोबर मधुमेहासाठी देखील हे फायदेशीर आहे. त्याचबरोबर कावीळ झाल्यावर याचे सेवन केल्यावर नक्की आराम मिळतो. जर कोणाला भूक नसेल लागत तर या भाजीचे सेवन केल्यानंतर भूक वाढते आणि पचनक्रिया देखील सुधारते

See also  जरूरतमंदों की सेवा से बड़ा कोई धर्म नहीं:- मंतोष मिश्रा।

Leave a Comment