Vegetable Rates : मागच्या काही दिवसापासून भाजीपाल्यांचे दर गगनाला भिडले आहेत त्यामुळे सर्वसामान्यांचे आर्थिक बजेट चांगलेच कोलमडले आहे. सर्वसामान्यांचे आर्थिक बजेट कोलमडले असले तरी भाजीपाला दर वाढल्याचा फायदा शेतकऱ्यांना मोठ्या प्रमाणात होत आहे. अनेक शेतकऱ्यांनी कोथिंबीर टोमॅटो किंवा इतर भाजीपाल्यातून लाखो रुपये कमवत आहेत. दरम्यान, पुणे कृषी उत्पन्न बाजार समितीच्या तरकारी विभागात मागणी आणि पुरवठा यातील समतोलामुळे काकडी, फ्लावर, कोबी आणि लसूण वगळता अन्य भाज्यांचे भाव मागच्या आठवड्याच्या तुलने स्थिर आहेत. (Pune Bajar Bhav)
रोजचे बाजारभाव चेक करण्यासाठी App डाउनलोड करा
लसणाची आणि कोबीची आवक घटल्यामुळे या भावामध्ये वाढ झाल्याची पाहायला मिळत आहे तर काकडी आणि फ्लॉवरचे भाव कमी झाले आहेत. मार्केटमधील फळभाज्यांची आवक मागच्या आठवड्याच्या तुलनेत काहीशी वाढल्याची माहिती समोर आली आहे. तुम्हाला जर पालेभाज्यांचे किंवा इतर शेतमालाचे बाजार भाव जाणून घ्यायचे असतील तर आत्ताच प्ले स्टोअर वर जाऊन आपले Hello Krushi हे ॲप इंस्टाल करा यामध्ये तुम्ही रोजचा बाजार भाव पाहू शकता त्याचबरोबर हवामान अंदाज, सरकारी योजनांची माहिती, पशूंची खरेदी विक्री त्याचबरोबर जमीन मोजणी इत्यादी शेतीविषयक गोष्टींची माहिती तुम्ही अगदी मोफत मिळवू शकता. त्यामुळे लगेचच प्ले स्टोअर वर जाऊन Hello Krushi हे ॲप इंस्टाल करा.
माहितीनुसार, गुलटेकडी मार्केट यार्ड या ठिकाणी बाजारामध्ये काल म्हणजेच रविवारी राज्याच्या विविध भागात राज्यासह परदेशातून सुमारे 900 ते 100 ट्रक फळभाज्यांचे आवक झाली आहे. त्याचबरोबर स्थानिक भागातून देखील मोठ्या प्रमाणात आवक झाली आहे.
कोथिंबीरीतून शेतकरी कमवतायेत लाखो रुपये
सध्या कोथिंबीर उत्पादक शेतकऱ्यांचे अच्छे दिन आहेत. कारण कोथिंबीर उत्पादक शेतकरी लाखोंचा नफा कमवत असल्याच्या बातम्या समोर येत आहेत. अनेक शेतकऱ्यांनी त्यांच्या शेतीतून लाखो रुपये कमवले आहेत. कोथिंबीरला मिळालेल्या चांगल्या बाजारभावामुळे हे शक्य झाले असल्याचे शेतकऱ्यांचे म्हणणे आहे. त्यामुळे जर आगामी काळात पालेभाज्यांचे असे दर टिकून राहिले तर शेतकरी लवकरच आर्थिकदृष्ट्या मजबूत होईल असे देखील बोलले जात आहे.
बाजारभाव – (Wednesday, 02 Aug, 2023)
शेतिमालाचा प्रकार – पालेभाजी
अनु | कोड नं. | शेतिमाल | परिमाण | आवक | किमान | कमाल |
---|---|---|---|---|---|---|
1 | 3001 | कोथिंबीर | शेकडा | 166267 | Rs. 200/- | Rs. 600/- |
2 | 3002 | मेथी | शेकडा | 66525 | Rs. 300/- | Rs. 800/- |
3 | 3003 | शेपू | शेकडा | 18360 | Rs. 400/- | Rs. 800/- |
4 | 3004 | कांदापात | शेकडा | 8880 | Rs. 500/- | Rs. 1500/- |
5 | 3005 | पालक | शेकडा | 15650 | Rs. 300/- | Rs. 1200/- |
6 | 3006 | मुळा | शेकडा | 1215 | Rs. 500/- | Rs. 1500/- |
7 | 3007 | चवळी पाला | शेकडा | 1360 | Rs. 500/- | Rs. 700/- |
8 | 3008 | करडई | शेकडा | 750 | Rs. 300/- | Rs. 700/- |
9 | 3009 | राजगिरा | शेकडा | 1000 | Rs. 300/- | Rs. 800/- |
10 | 3010 | ह. गड़ी | शेकडा | |||
11 | 3011 | पुदीना | शेकडा | 12680 | Rs. 200/- | Rs. 500/- |
12 | 3012 | नारळ | शेकडा | |||
13 | 3013 | मकाकणिस | शेकडा | |||
14 | 3014 | चाकवत | शेकडा | |||
15 | 3015 | अंबाडी | शेकडा | |||
16 | 3016 | चुका | शेकडा | 2775 | Rs. 300/- | Rs. 1000/- |
17 | 3017 | तांदुऴसा | शेकडा | |||
18 | 3018 | देठ | शेकडा | |||
19 | 3019 | माठ | शेकडा | |||
20 | 3020 | मोहरी | शेकडा | |||
21 | 3021 | चंदनबटवा | शेकडा | |||
22 | 3022 | आईसबर्ग | क्विंटल | 7 | Rs. 5000/- | Rs. 8000/- |