पाणी फिल्टर किंमत | पाणी फिल्टर मशीन सर्व माहिती व किंमत | पाणी फिल्टर / pani filter >> पूर्वी ग्रामीण भागात आपण शेतात किंवा नदीला डायरेक्ट नदीचे पाणी प्यायचो, नंतर काळ बदलला तसे गावागावात लोकांना पिण्याचे पाणी देण्यासाठी आड (विहिरी) झाल्या.आणि आता तर गावागावात आर.ओ.फिल्टर (pani filter) झालेले आपल्याला दिसतात.
हे सर्व झाले ते अशुद्ध पाण्यामुळे, वाढत्या जल प्रदूषणामुळे नदीचे पाणी आता शहारातील सांडपाणी वाहून नेणार्या एखाद्या नाल्याप्रमाणे दिसते तर त्या नदीमुळे गावातील विहीरींचे पाणी देखील खराब झालेले आहे. आज नाही म्हंटले तरी महाराष्ट्रातील ८० – ९० % ग्रामीण भागात ही अवस्था आहे.
आणि शहरी भागात तर जे कॉर्पोरेशन चे पाणी पूर्वीपासून येते ते तरी कुठे आता पूर्वी एवढे स्वच्छ आणि निर्मळ राहिले आहे. त्यामुळे अनेक लोक आता आपल्या घरात पिण्याच्या व स्वयंपाकाच्या कामासाठी लागणार्या पाण्यासाठी पाणी फिल्टर वापरू लागले आहेत.
अशाच पाण्यासाठी फिल्टर घेऊ इच्छ्णार्या सर्वांसाठी या लेखामध्ये काही चांगल्या गुणवत्तेचे व टिकाऊ पाणी फिल्टर दिलेले आहेत. त्यातील तुमच्या वापरा नुसार फिल्टर तुम्ही निवडू शकता.
पाणी फिल्टर किंमत व माहिती (pani filter price) / Water Filter Price & Information (वॉटर फिल्टर प्राइस)
घरगुती वापरासाठी योग्य असे अनेक फिल्टर आहेत. काहींना इलेक्ट्रिक फिल्टर हवा असतो तर काहींना नॉन इलेक्ट्रिक.या लेखामध्ये सुरवातीला आम्ही काही उत्कृष्ट नॉन इलेक्ट्रिक फिल्टर ची किंमत व माहिती दिलेली आहे. तर लेखाच्या शेवटी काही इलेक्ट्रिक फिल्टर ची किंमत व माहिती दिलेली आहे.
नॉन इलेक्ट्रिक पाणी फिल्टर किंमत व संपूर्ण माहिती / Non – Electric Water Filter Price
यांप्रकारच्या पाणी फिल्टर ला लाइट लागत नाही. या कॅटेगरी मधील जवळ जवळ सर्वच फिल्टर हे गुरुत्वाकर्षण तत्वाच्या आधारावर पाणी फिल्टर/ शुद्ध करतात. या कॅटेगरी मधील फिल्टरची किंमत ही १३०० – ३८०० रुपये या रेंज मध्ये आहे. चला तर मग बघूयात काही उत्कृष्ट नॉन इलेक्ट्रिक फिल्टर ची माहिती.
पीएच बॅलेन्स करण्याच्या आधुनिक फीचर सह हा फिल्टर ३००० – ३५०० टीडीएस असलेल्या पाण्यासाठी देखील वापरला जाऊ शकतो. या पाणी फिल्टर वर १ ते २ वर्षाची वॉरंटी कंपनी कडून देण्यात येते. जर तुमच्या घरातील पाण्याचा टीडीएस २००० च्या आत असेल तर कंपनी कडून २ वर्षाची वॉरंटी मिळते. आणि जर पाण्याचा टीडीएस २००० पेक्षा जास्त असेल तर १ वर्षाची वॉरंटी मिळते. या फिल्टर मशीन ची किंमत १७,०७० रुपये आहे.
२००० पर्यंत टीडीएस असलेल्या पाण्यासाठी उपयुक्त असा हा पाणी फिल्टर ८ लिटर च्या स्टोरेज टॅंक सह येतो. याची किंमत आणि फीचर ची सांगड घालायची म्हंटली तर किंमत जरा जास्त होते. या फिल्टर वर कंपनी कडून १ वर्षाची वॉरंटी देण्यात येते. याची किंमत २१,४९० रुपये आहे.
८ विविध स्टेज मध्ये पाणी प्युरीफिकेशन करणारा हा पाणी फिल्टर असून या मध्ये आरओ, एससीएमटी या आधुनिक फिल्टरेशन पद्धतीचा वापर करण्यात आलेला आहे. २००० पर्यंत टीडीएस असलेल्या पाण्यासाठी हा फिल्टर उपयुक्त असून या फिल्टर वर कंपनी कडून १ वर्षाची वॉरंटी देण्यात येते. या फिल्टर ची किंमत २३,७९९ रुपये आहे.
तात्पर्य
वरील सर्व फिल्टर हे घरगुती वापरासाठी उत्तम असून,टिकाऊ देखील आहेत. तुम्ही तुमचा वापर किती आहे, म्हणजेच कुटुंब संख्या किती आहे त्यानुसार पाणी फिल्टर घेऊ शकता. तसेच वरील फिल्टर पैकी इलेक्ट्रिक पाणी फिल्टर हे तुम्ही तुमच्या ऑफिसच्या वापरासाठी देखील घेऊ शकता. यातील एखाद्या फिल्टर विषयी आपल्याला अधिक माहिती हवी असेल किंवा खरेदी कराची असेल तर फोटो खालील “Check It On Amazon” या बटन वर क्लिक करा.
तुम्हाला ही माहिती कशी वाटली आम्हाला कमेंट करून जरूर कळवा. तसेच जर आमच्यासाठी आपल्या काही सूचना असतील तर त्या नक्की कमेंट करा.