Weather Update: राज्यात पावसाचा तडाखा सुरूच; आज ‘या’ भागात विजांसह पावसाची शक्यता

हॅलो कृषी ऑनलाईन : राज्यात अद्यापही परतीच्या पावसाचा (Weather Update) तडाखा सुरूच आहे. दिवसभर उन्हाचा चटका आणि संध्याकाळनंतर गडगडाटी विजांसह पाऊस हे मागील तीन दिवसांपासून राज्यातील बहुतांशी भागातील चित्र आहे. त्यामुळे यंदाच्या वर्षी दिवाळी पावसातच घालवावी लागते की काय अशी चिन्हे आहेत. तर दुसरीकडे काढणी केलेला पावसात भिजलेला सोयाबीन ,कापूस यासारखा शेतमाल सुकवताना शेतकऱ्यांच्या नाकीनऊ येत आहे. दरम्यान आजही (२०) राज्यातील कोकण, मध्य महाराष्ट्राच्या दक्षिणेकडील जिल्ह्यांमध्ये विजांसह पावसाची शक्यता कायम आहे. उर्वरित राज्यात पावसाचा जोर ओसरण्याची चिन्हे असून, तुरळक ठिकाणी हलक्या सरींचा अंदाज आहे.

हवामान स्थिती ?

उत्तर अरबी समुद्रापासून तमिळनाडूच्या किनाऱ्यापर्यंत हवेचा कमी दाबाचा (Weather Update) पट्टा सक्रिय आहे. पूर्व-मध्य अरबी समुद्रामध्ये महाराष्ट्राच्या किनाऱ्यालगत समुद्र सपाटीपासून १.५ किलोमीटर उंचीवर चक्राकार वाऱ्यांची स्थिती, तसेच त्यापासून केरळ किनाऱ्यापर्यंत हवेचा दक्षिणोत्तर कमी दाबाचा पट्टा कायम आहे. बंगालच्या उपसागरात उत्तर अंदमान समुद्रालगत ३.१ किलोमीटर उंचीवर चक्राकार वारे वाहत आहेत. आज (ता २०) या भागात कमी दाबाचे क्षेत्र तयार होण्याची शक्यता आहे. ही प्रणाली वायव्येकडे सरकताना शनिवारपर्यंत (ता. २२) आणखी तीव्र होईल. सोमवारपर्यंत (ता. २४) बंगालच्या उपसागरात चक्रीवादळाची निर्मिती होण्याचे संकेत हवामान विभागाने दिले आहेत.

See also  प्रतिरोध मार्च में 5 घंटे तीखी धूप में रहने के बाद भी तेजस्वी का जोश नहीं हुआ कम, कहा-हिला-हिलाकर सरकार को गिराएंगे

आज ‘या’ भागाला यलो अलर्ट

दरम्यान हवामान खात्याने वर्तवलेल्या अंदाजानुसार आज (Weather Update) कोकणातील रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग मध्य महाराष्ट्रातील नगर, पुणे, सोलापूर, सातारा, सांगली, कोल्हापूर या भागाला यलो अलर्ट देण्यात आला असून या भागात विजांसह पावसाची शक्यता आहे.

Leave a Comment