कारखाने खुशाल सुरु करा; पण मागच्या वर्षीच्या थकीत FRP चं काय? : राजू शेट्टींचा सरकारला सवाल

हॅलो कृषी ऑनलाईन : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या अध्याक्षतेखाली झालेल्या बैठकीत यंदाचा ऊस गाळप हंगाम १५ ऑक्टोबर पासून सुरु होणार असल्याचे जाहीर करण्यात आले. यंदाचा गळीत हंगाम तर जाहीर झाला मात्र मागच्या वर्षीच्या थकीत FRP चं काय असा सवाल स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे अध्यक्ष राजू शेट्टी यांनी सरकारला केला आहे. शिवाय थकीत FRP चे 900 कोटींसह, 200 रुपये अधिकचे मिळेपर्यंत एकही कारखाना सुरु होऊ देणार नाही असा इशारा देखील शेट्टी यांनी दिला आहे.

आधी थकीत रक्कम द्या आणि मग कारखाने सुरु करा अन्यथा शेतकऱ्यांच्या संघर्षाला सामोरे जा असा इशाराच शेट्टी यांनी दिला आहे. शिवाय मागील वर्षी कारखान्यांना इथेनॉल विक्रीतून मोठ्या प्रमाणात नफा झाला होता. त्यामुळं 200 रुपये अधिक देण्याची कारखान्यांची क्षमता असल्याचे राजू शेट्टी म्हणाले यंदाचा अहानागाम सुरु कराल मात्र मागील थकीत FRP चे काय ? असा थेट सवाल शेट्टी यांनी सरकारला केला आहे.

आधी शेतकऱ्यांची देणी भागवा…

पुढे बोलताना शिट्टी म्हणाले , FRP चा रुपयाना रुपया जोपर्यत शेतकऱ्यांना मिळत नाही, तोपर्यंत राज्यातील एकही साखर कारखाना सुरु होऊ देणार नाही. गेल्या वर्षी निर्यात झालेल्या साखरेला चांगला दर मिळाला. देशांतर्गत साखरेला चांगला दर मिळाला. तसेच इथेनॉलच्या उत्पादनामुळं रोख पैसे उपलब्ध झाल्यामुळं साखर कारखान्यांकडे FRP शिवाय 200 रुपये ज्यादा देण्याची क्षमता तयार झाली आहे. हे पैसे जोपर्यंत मिळणार नाहीत तोपर्यंत ऊस उत्पादक आणि साखर कारखानदार हा संघर्ष थांबणार नाही.

तर ऊसाचा बुडका कारखानदारांच्या पाठित

15 ऑक्टोबरपासून तुम्हाला साखर कारखाने सुरु करायचे असतील तर खुशार सुरु करा. मात्र, शेतकऱ्यांची FRP आणि 200 रुपये ही देणी भागवा आणि मग कारखाने सुरु करा असे शेट्टी म्हणाले. कारखान्यांना ऊस देण्यासाठीच ऊस लावला आहे. निव्वळ ऊसच मागत राहिलात तर ऊसाचा बुडका कारखानदारांच्या पाठित बसल्याशिवाय राहणार नसल्याचे शेट्टी  म्हणाले.

Comments

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *