राज्यात ओला दुष्काळ जाहीर करणार की नाही? कृषीमंत्र्यांनी दिली माहिती

हॅलो कृषी ऑनलाईन : परतीच्या पावसामुळे शेतकऱ्यांचे अतोनात नुकसान झाले आहे. विरोधी पक्षनेत्यांसह इतर राजकीय व्यक्तींनी तसेच शेकरी संघटनांनी देखील राज्यात ओला दुष्काळ जाहीर करण्याची मागणी केली आहे. मात्र राज्याचे कृषी मंत्री अब्दुल सत्तार यांनी ओला दुष्काळ जाहीर करणार की नाही याबाबत माहिती दिली आहे. राज्यात सरसकट ओला दुष्काळ जाहीर करावा अशी स्थिती नाही. पण ज्या भागामध्ये नुकसान झालं आहे, त्या भागाचे पंचनामे केल्यावरच आपल्याला किती नुकसान झालं ते समजेल असेही सत्तार म्हणाले.

याबाबतीत पुढे बोलताना सत्तार म्हणाले, परतीचा पाऊस हा काही पहिल्या वर्षी झाला असे नाही. प्रत्येक वेळी तो पडतो, त्याचा अंदाज लावता येत नाही असेही सत्तार म्हणाले. जिथे जिथे शेतकऱ्यांचे नुकसान झाले आहे, त्याबाबतची माहिती आमच्याकडे येत आहे. त्या नुकसानीचा आकडा लकरच कळेल. त्या शेतकऱ्यांना मदत देण्यात येईल असे सत्तार म्हणाले. प्रत्येक वेळी कृषी विभागाची मंत्रीमंडळ बैठकीत चर्चा होते. साडेपाच हजार कोटी रुपयांची नुकसान भरपाई सरकारनं आतापर्यंत दिली आहे. पुढच्या काळातही सरकार शेतकऱ्यांच्या पाठिशी उभं असल्याची माहिती मुख्यमंत्री शिंदे यांनी दिले असल्याचे सत्तार म्हणाले.

शेतकरी मदतीपासून वंचित राहणार नाही

विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी ओला दुष्काळ जाहीर करावा अशी मागणी केली आहे. मात्र, ओला दुष्काळ जाहीर करावा अशी परिस्थिती नाही. पण ज्या शेतकऱ्यांचे नुकसान झालं आहे तो शेतकरी मदतीपासून वंचित राहणार नाही नाही याची दक्षता कृषी अधिकारी, जिल्हाधिकारी घेतील असे सत्तार म्हणाले. पंचनामा करण्याचे तत्काळ आदेश अधिकाऱ्यांना दिले आहेत. पण वस्तुनिष्ठ पंचनामे होत नाहीत तोपर्यंत अंतिम नुकसानीचा आकडा येणार नाही असे सत्तार म्हणाले.

पहिल्या नुकसानीचे तीन हजार 500 कोटी रुपये शेतकऱ्यांना दिले आहेत. 600 कोटी रुपये नंतर दिले त्यानंतर गोगलयीनं नुकसान झालेल्या क्षेत्राला देखील मदत दिली असल्याचे सत्तार म्हणाले. गेल्या 25 वर्षात तत्काळ मदत देण्याच काम पहिल्यांदाच झालं असल्याचे सत्तार म्हणाले. विरोधी पक्षाला फक्त विरोधच करायचा आहे. शेतकऱ्यांना मी विनंती करतो की आत्महत्येसारखं पाऊस उचलू नका. हा अंतिम पर्याय नसल्याचे सत्तार यावेळी म्हणाले.

Comments

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *