झेरॉक्स मशीन किंमत | स्वस्त काही झेरॉक्स मशीन

झेरॉक्स मशीन किंमत | स्वस्तातील व किफायतशीर काही झेरॉक्स मशीन ची सर्व माहिती >> झेरॉक्स ही हल्ली सगळी कडेच लागते, आपल्याला बँकेत अर्ज कारायचा म्हंटले किंवा तहसील मध्ये अर्ज करायचा म्हंटले तरी झेरॉक्स चा सेट हा लागतोच. मग जर तुमच्या घरीच एखादी झेरॉक्स ची मशीन असेल तर तुम्हाला पाहिजे टेणवा तुम्ही पाहिजे तेवढ्या झेरॉक्स काढू शकता.

तसेच अनेक युवा तरुण ग्रामीण किंवा शहरी भागात स्वतःचे असे नवीन ऑनलाइन सर्विस सेंटर चालू करतात आणि मग त्यांना व्यवसायासाठी झेरॉक्स मशीन ची आवश्यकता असते.

अशा सर्वांसाठी या लेखामध्ये काही स्वस्तातील झेरॉक्स मशीन ची माहिती दिलेली आहे तसेच काही व्यावसायिक वापरासाठी देखील काही झेरॉक्स मशीन ह्या लेखामध्ये दर्शवलेल्या आहेत. चला तर मग जाणून घेऊया काही उत्कृष्ट गुणवत्तेच्या झेरॉक्स मशीन ची किंमत व गरजेची सर्व माहिती.

झेरॉक्स मशीन ची किंमत व सर्व माहिती

खाली काही घरगुती वापराच्या व व्यवसायासाठी वापरता येण्याजोग्या झेरॉक्स मशीन ची माहिती दिलेली आहे. तुमच्या सोयी साठी इंकजेट,लेसरजेट व व्यावसायिक वापरासाठी मोठ्या झेरॉक्स मशीन असे वर्गीकरण केलेले आहे. तुम्ही तुमच्या वापरा नुसार झेरॉक्स मशीन निवडू शकता.

इंकजेट ऑल इन वन (स्कॅनिंग + प्रिंटिंग + झेरॉक्स मशिन किंमत)

या कॅटेगरी मधील झेरॉक्स मशिन ह्या इंकजेट प्रिंटिंग मशीन असून यांचा उपयोग करून तुम्ही झेरॉक्स सोबतच स्कॅनिंग आणि प्रिंटिंग देखील करू शकता. या प्रिंटिंग मशीन वर तुम्ही कलर प्रिंट व कलर झेरॉक्स देखील काढू शकता. ही मशीन किंमतीने देखील कमी आहे आणि तुम्हाला घरगुती वापरासाठी किंवा ग्रामीण भागातील ऑनलाइन सेंटर च्या व्यवसायासाठी उपयुक्त आहे.या कॅटेगरी मधील झेरॉक्स मशीन ची किंमत ही ३,००० ते १६,००० रुपयांच्या दरम्यान आहे.

Canon MG2570S Multi-Function Inkjet Colour Printer

ऑल इन वन असा हा प्रिंटर असून या मध्ये तुम्ही प्रिंट,स्कॅनिंग आणि झेरॉक्स देखील काढू शकता.या झेरॉक्स मशिन ची किंमत ३,४०० रुपये आहे.

HP DeskJet 2331 All-in-One Inkjet Colour Printer

एचपी कंपनी चा हा देखील ऑल इन वन प्रिंटर असून या मध्ये देखील तुम्ही प्रिंट,स्कॅनिंग आणि झेरॉक्स देखील काढू शकता. या मशीन वर तुम्ही कलर झेरॉक्स करू शकता. व या मशीन वर कंपनी कडून 1 वर्षाची वॉरंटी मिळते. या झेरॉक्स मशिन ची किंमत ३,४६७ रुपये आहे.

See also  How to do Ghatsthapana / Ghatsthapana information (ghatsthapana information in Marathi)

Canon Pixma E410 All-in-One Inkjet Printer

प्रिंट, स्कॅन आणि झेरॉक्स साठी हे मशीन योग्य आहे. ही झेरॉक्स मशिन आकाराने लहान आणि वजनाने हलकी आहे. या झेरॉक्स मशीन ची किंमत ४,१९९ रुपये आहे.

या प्रिंटर वर देखील तुम्ही प्रिंट, स्कॅन आणि झेरॉक्स अशी ३ ही कामे करू शकता. या झेरॉक्स मशीन वर तुम्ही महिन्याला अंदाजे १००० प्रिंट काढू शकता. या झेरॉक्स मशीन ची किंमत ४,९९९ रुपये आहे.

एचपी कंपनी चा हा एक स्मार्ट प्रिंटर असून, या प्रिंटर मशीन मध्ये देखील तुम्ही प्रिंट, स्कॅनिंग आणि झेरॉक्स करू शकता. या झेरॉक्स मध्ये वॉइस अॅक्टिवेटेड प्रिंटिंग फीचर देखील आहे, जे अलेक्सा वर आधारित वर्क करते. या मशीन वर वायफाय वरून प्रिंटिंग शक्य आहे. या झेरॉक्स मशीन ची किंमत ६,९९८ रुपये आहे.

Canon Pixma G2012 All-in-One Ink Tank Colour Printer

प्रिंटिंग, स्कॅनिंग आणि झेरॉक्स करता येण्यासारख्या ह्या मशीन ल १.२ इंचाचा एलसीडी डिसप्ले देखील आहे. कलर प्रिंटिंग सोबतच कलर झेरॉक्स देखील काढू शकता. घरगुती वापरा बरोबरच ऑफिस मध्ये देखील वापरू शकता. या प्रिंटर वर एक ब्लॅक अँड व्हाइट प्रिंट ९ पैसे आणि कलर प्रिंट ही जवळ जवळ ३२ पैसे पडते. या प्रिंटर वर तुम्ही A4 / Letter / Legal / A5 / B5 या वेगवेगळ्या साइज चे पेपर प्रिंट करू शकता व A4 साइज च्या झेरॉक्स काढू शकता. या झेरॉक्स मशीन ची किंमत ९,९९९ रुपये आहे.

Epson EcoTank L3110 All-in-One Ink Tank Printer

या प्रिंटर वर तुम्ही A4, A5, A6, B5, C6, DL या वेगवेगळ्या साइज चे पेपर प्रिंट करू शकता. ह्या प्रिंटिंग मशीन वर ब्लॅक & व्हाइट प्रिंट चा खर्च ७ पैसे तर कलर प्रिंट चा खर्च १८ पैसे येतो. तसेच कंपनी कडून या झेरॉक्स मशीन वर १ वर्षाची वॉरंटी मिळते. झेरॉक्स मशीन ची किंमत ११,४४९ रुपये आहे.

Epson M2140 EcoTank Monochrome All-in-One Duplex Ink Tank Printer

प्रिंट,स्कॅनिंग आणि झेरॉक्स ची सुविधा असलेली ही मशीन आकाराने लहान असून, ऑटो डुप्लेक्स प्रिंटिंग करता येते. या मशीन वर प्रिंट ची कॉस्ट अंदाजे १२ पैसे पडते. व प्रिंट चा स्पीड ३९ प्रिंट पर मिनीट आहे. झेरॉक्स मशीन ची किंमत १५,९९९ रुपये आहे.

See also  BSNL यूजर्स की बल्ले बल्ले! महज ₹700 से कम में 365 दिनों तक चलेगा मोबाइल..

लेसर जेट ऑल इन वन (स्कॅनिंग + प्रिंटिंग + झेरॉक्स मशीन किंमत)

या कॅटेगरी मधील झेरॉक्स मशीन ह्या लेसरजेट मशीन असून यांचा उपयोग करून तुम्ही झेरॉक्स सोबतच स्कॅनिंग आणि प्रिंटिंग देखील करू शकता. या प्रिंटिंग मशीन वर तुम्ही कलर प्रिंट किंवा कलर झेरॉक्स काढू शकत नाही. परंतु या मशीन चा रनिंग खर्च फार कमी असतो. त्यामुळेच या झेरॉक्स मशीन ची किंमत इंक जेट पेक्षा जास्त असते. आणि तुम्हाला ऑनलाइन सेंटर च्या व्यवसायासाठी या मशीन इंकजेट च्या तुलनेत जास्त उपयुक्त आहेत.

बरेच वकिल किंवा दैनंदिन झेरॉक्स किंवा प्रिंट लागणार्‍या प्रोफेशन मधील लोक ह्या मशीन घरातच वापरतात. या मशीन वर एक प्रिंट मारायला येणारा खर्च फार कमी आहे. या कॅटेगरी मधील झेरॉक्स मशीन ची किंमत ही १३,००० ते २०,००० रुपयांच्या दरम्यान आहे.

Brother DCP-L2520D Multi-Function Monochrome Laser Printer with Auto-Duplex Printing

ही झेरॉक्स मशीन जवळ जवळ ३० प्रिंट मिनिटाला मारू शकते. या झेरॉक्स मशीन वर देखील प्रिंट, स्कॅन आणि झेरॉक्स हे ३ फीचर आहेत. ही मशीन लेसर जेट असल्यामुळे या मशीन वर प्रिंटचा खर्च इंकजेट च्या तुलनेने फार कमी आहे. या झेरॉक्स मशीन वर A4, Letter, A5, A5(Long Edge), A6, Executive, Legal, Folio, Mexico Legal, India Legal एवढ्या प्रकारचे पेपर तुम्ही वापरू शकता. या झेरॉक्स मशीन ची किंमत १३,७९९ रुपये आहे.

Canon MF3010 Digital Multifunction Laser Printer

कॅनन कंपनी ची ही झेरॉक्स मशीन असून या मशीन वर महिन्याला तुम्ही ८,००० पेज प्रिंट किंवा झेरॉक्स करू शकता. या झेरॉक्स मशीन ची किंमत १४,०९९ रुपये आहे.

Brother DCP-B7500D Multi-Function Monochrome Laser Printer with Auto Duplex Printing

जवळ जवळ १५,००० पेज दर महिन्याला तुम्ही ह्या मशीन वर प्रिंट किंवा झेरॉक्स करू शकता. या मशीन वर मिनिटाला ३४ पेपर प्रिंट होतील एवढा ह्या मशीन चा स्पीड आहे. घरगुती ऑफिस किंवा लहान ऑफिस च्या वापरा साठी ही झेरॉक्स मशीन योग्य आहे. या मशीन वर देखील तुम्ही A4, Letter, A5, A5(Long Edge), A6, Executive, Legal, Folio, Mexico Legal, India Legal एवढ्या विविध साइज चे पेपर प्रिंट किंवा झेरॉक्स करू शकता. या झेरॉक्स मशीन ची किंमत १५,४३६ रुपये आहे.

HP Laserjet Pro M126nw Multi-Function Direct Wireless Network Laser Printer

See also  होटल मधुमाला इंटरनेशनल देवघर, झारखंड, भारत

एचपी कंपनी च्या ह्या झेरॉक्स आणि प्रिंटिंग मशीन चा वापर तुम्ही घरगुती त्याच बरोबर लहान व्यवसायासाठी देखील करू शकता. या मशीन ला तुम्ही वायफाय, यूएसबी आणि HP ePrint ह्या प्रकारे कनेक्ट करू शकता. या मशीन वर देखील विविध आकाराचे पेपर प्रिंट होऊ शकतात. या झेरॉक्स मशीन ची किंमत १५,९९९ रुपये आहे.

कॅनन कंपनी च्या या मशीन वर तुम्ही महिन्याला जवळपास १५,००० पेज प्रिंट किंवा झेरॉक्स करू शकता. आणि मिनिटाला २३ पेपर प्रिंट करण्याचा ह्या मशीन च स्पीड आहे. या झेरॉक्स मशीन ची किंमत १६,०७६ रुपये असून कंपनी कडून या मशीन वर १ वर्षाची वॉरंटी देण्यात येते.

Canon MF241D Digital Multifunction Laser Printer

कॅनन कंपनी चा हा ऑल इन वन कॅटेगरी मधला उत्कृष्ट लेसर प्रिंटर असून या मशीन वर झेरॉक्स आणि स्कॅनिंग देखील करू शकता. या मशीन वर कंपनी कडून १ वर्षाची वॉरंटी मिळते व ह्या झेरॉक्स मशीन ची किंमत १६,४९४ रुपये आहे.

HP Neverstop Laser Multi-Function, 1200a Printer

एचपी कंपनीच्या या झेरॉक्स मशीन मध्ये विविध आकाराच्या पेजेस वर प्रिंट मारू शकता. या झेरॉक्स मशीन वर तुम्ही महिन्याला २०,००० पेपर प्रिंट किंवा झेरॉक्स करू शकता. झेरॉक्स मशीन ची किंमत १७,३९९ रुपये असून कंपनी कडून १ वर्षाची ऑन साइट वॉरंटी मिळते.

HP Laserjet M1005 Multifunction Laser Printer

२ इंच आकाराचा एलसीडी डिसप्ले असलेले हे एचपी कंपनीचे मशीन असून या मशीन वर तुम्ही A4, A5, B5, C5, C6, DL, postcard या साइज मधले पेपर वापरू शकता. ह्या झेरॉक्स मशीन ची किंमत १७,९९९ रुपये आहे.

HP Neverstop Laser Multi-Function Direct Wi-fi 1200w Printer with Google Cloud Print

महिन्याला २०,००० प्रिंट काढण्याची क्षमता असलेल्या एचपी कंपनीच्या या झेरॉक्स आणि प्रिंटिंग मशीन वर कंपनी कडून १ वर्षाची वॉरंटी मिळते. व या झेरॉक्स मशीन ची किंमत १८,५९९ रुपये आहे.

HP Laserjet Pro M1136 Multifunction Monochrome Laser Printer

घरगुती तसेच लहान व्यवसाया मध्ये वापरण्यासाठी एचपी कंपनीचा ही झेरॉक्स मशीन खूप लोकप्रिय आहे. या मशीन ला मेंटेनेंस कॉस्ट जवळ पास नसल्या सारखेच आहे. अतिशय उत्तम आणि टिकाऊ असे हे मशीन असून या मध्ये तुम्ही प्रिंट,स्कॅन आणि झेरॉक्स हे प्रमुख ३ ही फीचर वापरू शकता. या झेरॉक्स मशीन ची किंमत १९,९०० रुपये आहे.

व्यावसायिक वापरासाठी मोठ्या झेरॉक्स मशीन ची संपूर्ण माहिती

Brother DCP-B7535DW Multi-Function Monochrome Laser Printer with Auto Duplex Printing & Wi-Fi

झेरॉक्स मशीन ची किंमत १९,९९५ रुपये आहे.

HP Laserjet Pro M128fn All-in-One Monochrome Printer

Leave a Comment